ETV Bharat / state

शिरूर लोकसभेला आढळराव-कोल्हे सामना रंगणार? अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव राष्ट्रवादीत दाखल - SHIVAJI ADHALRAO PATIL JOINs NCP - SHIVAJI ADHALRAO PATIL JOINS NCP

Shivaji Adhalrao Patil Joins NCP : गेल्या अनेक दिवसांपासून चाललेली चर्चा अखेर थांबली. शिवसेना नेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मंगळवार (दि. 26 मार्च)रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दरम्यान, अजित पवार शिरूरमधून आढळराव पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवतील अशी शक्यता आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 9:49 PM IST

पिंपरी चिंचवड Shivaji Adhalrao Patil Joins NCP : पूर्वीच्या शिवसेनेचे आणि सध्याच्या एकनाथ शिंदे गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अखेर मंगळवारी (दि. २६ मार्च)रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर अनेक चर्चांना विराम मिळाला आहे. मात्र, नवीन चर्चांना उधाण आलं आहे. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील देखील उपस्थित होते. (Adhalrao Patil) शिवाजीराव आढळरावांच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अजित पवार शिरूरमधून आढळराव पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवतील अशी शक्यता आहे.

उमेदवारी केली जाहीर : माजी खासादर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आढळराव यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. परंतु, अजित पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील आणि आढळराव यांच्यात दिलजमाई झाली. त्यामुळे आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

सर्वांची कामं करणार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याव्यतिरिक्त सर्व खासदार शरद पवारांबरोबर थांबले. शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटात जाण्यास नकार दिला. त्यामुळे अजित पवार गटाला या मतदारसंघात एका तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती. तर दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याने शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी आढळराव बोलताना म्हणाले, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या पक्षातील सर्व नेत्यांबरोबर समन्वय राखला जाईल. पंधरा वर्षाच्या खासदारकीच्या काळात अनेक प्रकल्प राबवले जातील. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आणि या मतदारसंघातून पुन्हा निवडून येऊन येथील प्रश्न सोडवणार असंही आढळराव पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा :

1 रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर; पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा - NCP candidate list

2 उबाठा गटाची बुधवारी 15 उमेदवारांची यादी जाहीर होणार, ठाकरे गट किती जागा लढवणार? - Lok Sabha Elections

3 आजोबांनी चालवलेली चळवळ लाचार करून संपवू नका - ॲड. प्रकाश आंबेडकर - Adv Prakash Ambedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.