ETV Bharat / state

नारायण राणेंनी चुकीच्या मार्गाने विजय मिळवला, कारवाई करा; शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र - action against Narayan Rane - ACTION AGAINST NARAYAN RANE

Action against Narayan Rane : भाजपाचे विजयी खासदार नारायण राणे चुकीच्या मार्गाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळं त्यांची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाकडून) करण्यात आली आहे. प्रचाराच्या वेळी मतदारांना दमदाटी करण्यात आल्याचा आरोपही ठाकरे गटाने केलाय.

Thackeray Faction On Rane
नारायण राणे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 8:55 PM IST

मुंबई Action against Narayan Rane : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे; मात्र मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा तिढा आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जुंपली असताना, आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून देखील वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण येथे भाजपाचे विजयी खासदार नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत आणि चुकीचा प्रचार करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळं त्यांची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाकडून) करण्यात आली आहे.

प्रचारादरम्यान, पैसे वाटल्याचा आरोप : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या प्रचारावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार संपलेला असतानासुद्धा ईव्हीएम मशीन दाखवून नारायण राणेंना मतं द्या असं आवाहन करण्यात आलं. तसंच प्रचारादरम्यान मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत, असं नोटिसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं नारायण राणे यांची खासदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढविण्यास तसंच मतदान करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही कायदेशीर नोटिस शिवसेना (ठाकरे) पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला वकील असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक आणि अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत पाठवलेली आहे.

नितेश राणेंकडून मतदारांना धमकी : प्रचाराच्या वेळी मतदारांना दमदाटी करणे, मतदारांना धमकावणे असे प्रकार राणे कुटुंबाकडून करण्यात आल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. प्रचारादरम्यान जर राणे साहेबांना मतदान केली नाही किंवा राणे साहेबांना लीड मिळाले नाही तर आमच्याकडे निधी मागायला कधीच यायचे नाही. आम्ही तुम्हाला निधी देणार नाही किंवा कोणतीही मदत आम्ही तुम्हाला करणार नाही, अशी धमकी नितेश राणेंनी मतदारांना दिली होती. याचादेखील उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. मतदान आणि मतमोजणी मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित असते; मात्र कोकणात निवडणूक आयोग अधिकाऱ्याच्या मदतीने चुकीच्या पद्धतीने मतदान आणि मतमोजणी पार पडली. परंतु हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी निवडणूक आयोगाने करावी, असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी - बावनकुळे - Chandrasekhar Bawankule
  2. राज्यात पोलीस भरती सुरू, एका पदासाठी तब्बल 101 अर्ज, पुरेशा सुविधांअभावी उमेदवारांची गैरसोय - Maharashtra Police Recruitment
  3. जगन मोहन रेड्डींच्या आलिशान राजवाड्यात 15 लाखाचा कमोड, बेडरूमची किंमत पाहून व्हाल थक्क - Jagan Mohan Reddy House Cost

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.