ETV Bharat / state

एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन : शिवसेनेचे आमदार-खासदार फुटण्याच्या भीतीनं 'हे' आदेश - Shiv Sena MP At Shivaji Park - SHIV SENA MP AT SHIVAJI PARK

Shiv Sena MP At Shivaji Park : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनी शिवाजी पार्क इथं जात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आल्यास उर्जा मिळते, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Shiv Sena MP At Shivaji Park
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 7:43 AM IST

Updated : Jun 7, 2024, 11:14 AM IST

मुंबई Shiv Sena MP At Shivaji Park : लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानं महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार खासदार फुटू नयेत, याची खबरदारी घेण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नवनिर्वाचित खासदारांनी गुरुवारी शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर जाऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदार खासदारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात न राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवनिर्वाचित खासदारांचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन : शिवाजी पार्क इथं खासदार श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, संदिपान भुमरे आदी खासदारांनी उपस्थिती लावत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. या खासदारांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं. दरम्यान, "इथं आल्यानंतर नेहमीच ऊर्जा मिळते. बाळासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर नेहमीच एक उत्साह येतो. नवीन ऊर्जा येते," असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच "खासदार म्हणून आम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे इथं सर्व खासदार येऊन आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. त्यांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले," असं माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले.

आघाडीच्या संपर्कात राहू नका : दुसरीकडं गुरुवारी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना पुढील कामासाठी मार्गदर्शन केलं. आपल्या पक्षातील काही खासदार किंवा आमदार फुटतील या भीतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना वर्षा बंगल्यावर बोलवल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे 'इंडिया' नेत्यांच्या सपंर्कात न राहण्याची ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडं मुंबईत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पक्षाची बैठक घेतली असून, शरद पवारांनी देखील बैठक घेतली आहे. तसेच अजित पवार गटातील काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात फटाक्यामुळं भाजली आज्जी; दोनशे रुपये बेतले जीवावर - Lok Sabha Election 2024
  2. ठाकरे पिता-पुत्रांनी दोन वर्षात मुख्यमंत्र्यांना शिव्या-शाप दिल्याशिवाय काय केलं; खासदार श्रीकांत शिंदेंचा सवाल - Lok Sabha Election 2024
  3. संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut

Last Updated : Jun 7, 2024, 11:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.