बुलडाणा Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठ वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान करत त्यांनी 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठी खळबळ उडाली. आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान : संपूर्ण भारतामध्ये गोर गरीब गरीब जनता जगू शकत नव्हती. त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी वगैरे सगळ्यांना आरक्षण दिलं. आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, महायुती संविधान बदलणार आहे, असा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आला. त्यामुळे आता आरक्षण संपणार या बोंबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली. आता राहुल गांधी देशातील आरक्षण संपवण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. त्यामुळए त्यांचा खरा चेहरा आज लोकांच्या समोर आला आहे, अशी जोरदार टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ट्विट - महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे. ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे कारस्थान सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही. राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणात नाही. काँग्रेसचे कोट्यवधी कार्यकर्ते राहुल गांधींची ढाल आहेत. महत्वाचे म्हणजे या देशातील सामान्य जनता राहुल गांधी यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. संजय गायकवाड या आमदाराच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यात जर कायद्याचे थोडे बहुत राज्य शिल्लक असेल तर तातडीने संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून, राज्यसरकारने अशा विषवल्लीला मुळापासून उखडून फेकले पाहिजे. अशा प्रकारचं ट्विट करुन बाळासाहेब थोरात यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 16, 2024
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही.
राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे.
ते… pic.twitter.com/ewPEMrM2l6
संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल - अखेर आ. सजंय गायकवाट यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला. एफआयआरची कॉपी हातात घेऊन मध्यप्रदेशचे माजी आमदार तसंच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबवलं. कलम 351(2,3,4) तसंच 192 अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात फिर्यादी म्हणून समाधान पुंडलिक दामधर रा. जामोद, ता. जळगाव जामोद यांचे नाव आहे. " गुन्हा दाखल झाला आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल ", असा इशारा अ. भा. काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी मीडिया प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेसनेआंदोलन केले.
हेही वाचा :
- आरक्षण संपवण्याची भाषा केली तर जीभ हासडल्या जाईल : संजय गायकवाड यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Sanjay Gaikwad Slams Rahul Gandhi
- तलवारीनं केक कापणं भोवलं! शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल - Sanjay Gaikwad News
- 'गावगुंडांच्या सुपाऱ्या मातोश्रीवर घेतात, आम्ही घेतलेल्या सुपाऱ्या'. . .संजय गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Sanjay Gaikwad Slams Sanjay Raut