ETV Bharat / state

दोन वर्षानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद; राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा बंदोबस्त - आमदार रवी राणा

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजापेठ उड्डाणपुलावर ( Shivaji Maharaj statue on Rajapeth Flyover ) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार, अशी भूमिका आमदार रवी राणा (Ravi Rana) समर्थकांनी जाहीर केली होती. त्यामुळं राजापेठ उड्डाणपूल परिसरात रात्रीपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय.

Shiv Jayanti 2024
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 12:38 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद

अमरावती Shiv Jayanti 2024 : राजापेठ उड्डाणपुलावर दोन वर्षांपूर्वी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. महापालिका प्रशासनाने हा पुतळा काढून घेतल्यामुळं आमदार रवी राणा समर्थक आणि महापालिका प्रशासनामध्ये प्रचंड वाद उफाळून आला होता. यावर्षी पुन्हा त्याच ठिकाणी आमदार राणा समर्थकांनी नवा चबुतरा बांधला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार असं सांगण्यात आलंय. या प्रकारामुळं शहरात पुन्हा एकदा वाद चिघळू नये, यासाठी राजापेठ उड्डाण पुलावर रविवारी रात्रभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

आता एका दिवसात बांधला चबुतरा : राजापेठ उड्डाण पुलावर ज्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता, त्या ठिकाणी आमदार रवी राणा समर्थकांनी एका दिवसातच चबुतरा बांधला. रविवारी रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आणून बसविला जाईल असं सांगण्यात आल्यामुळं पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला होता. दंगा नियंत्रण पथक देखील राजापेठ उड्डाणपुलावर रात्रभर तैनात होते. रात्री राजापेठ उड्डाणपुलावर आमदार राणा समर्थक बिरकले देखील नाही, मात्र आज दिवसभरात काही गोंधळ होऊ नये यासाठी राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.

असं आहे प्रकरण : युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीनं राजापेठ उड्डाणपुरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 12 जानेवारी 2022 ला मध्यरात्री स्थापना केली होती. बारा जानेवारीपासून 15 जानेवारी पर्यंत या ठिकाणी आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून जल्लोष केला होता. दरम्यान अनधिकृतपणे स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनानं 16 जानेवारी 2022 च्या मध्यरात्री हटविल्यामुळं दुसऱ्या दिवशी राणा समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर राणा समर्थक आणि महापालिका प्रशासन आमने-सामने उभे ठाकले होते. महापालिकेवर राणा समर्थकांनी मोठा मोर्चादेखील काढला होता. त्यावेळी राजापेठ परिसरात एकूण नऊ ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या दिवसापासून आजपर्यंत राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचे एक वाहन कायम तैनात असते.

महापालिका आयुक्तांवर फेकली होती शाई : आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी 9 फेब्रुवारीला राजापेठ भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याबाबत तक्रार करून महापालिका आयुक्तांना या भागाची पाहणी करण्यासाठी बोलावलं होतं. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे राजापेठ उड्डाणपूल परिसरात आले असता, आमदार रवी राणा समर्थक तीन महिलांनी त्यांच्या अंगावर शाही फेकली होती. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली होती. तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये सदर तीन महिलांसह आमदार रवी राणा आणि त्यांच्या दहा कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पाच जणांना अटकदेखील करण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. शिवजयंती तारखेनुसार का साजरी केली जाते? शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कधीपासून सुरू झाला शासकीय सोहळा? जाणून घ्या
  2. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पडला पार; शिवनेरी गडावर शिवप्रेमींची गर्दी
  3. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचं महाराजांना अनोख्या शैलीत अभिवादन, दोन मिनिटांचा व्हिडिओ केला पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.