ETV Bharat / state

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पडला पार; शिवनेरी गडावर शिवप्रेमींची गर्दी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 6:52 AM IST

Updated : Feb 19, 2024, 9:54 AM IST

Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी जयंती (Shivaji Maharaj Jayanti) आहे. यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय सोहळा पार पडला. किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांनी मोठी गर्दी केलीय. त्यामुळं परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

पुणे Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज (Shivaji Maharaj Jayanti) जयंती आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर मोठ्या संख्येनं शिवप्रेमी (Chhatrapati Shivaji Maharaj) दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा शासकीय सोहळा पार पडला. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह लाखो शिवभक्त शिवनेरी गडावर हजर होते.

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा : सकाळी 8 वाजता किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मस्थानी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गाण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत तसंच 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकानं वाजवून सलामी देली आणि त्यानंतर पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध मर्दानी खेळही शिवभक्तांकडून सादर करण्यात आले.

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह : आज, 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतोय. ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

किल्ले शिवनेरी नटली : किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय सोहळा पार पडलाय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे. शिवनेरी गडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केलीय. सोलापुरातही शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री 12 वाजता पाळणा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. राज्यातील विविध भागात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

हेही वाचा :

  1. नाशिकच्या शिवजयंतीचं खास आकर्षण; डोळ्याचे पारणे फेडणारा शिवरायांचा 65 फूट भव्यदिव्य पुतळा
  2. 'छत्रपती शिवाजी महाराजांना घ्यायचा होता संन्यास'; गोविंद गिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे राज्यात वातावरण तापलं
  3. परवानगी द्या, शिवजयंतीपासून आम्ही शिवप्रेमी स्मारकाचं काम हाती घेऊ- विनोद पाटील यांची मागणी

Last Updated : Feb 19, 2024, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.