ETV Bharat / state

लाखो साईभक्त शिर्डीत दाखल; भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार साई मंदिर - Sai baba Gurupurnima Festival

Shirdi Sai baba Gurupurnima: साईबाबांच्या शिर्डी नगरीतही गुरु पौर्णिमेची धामधूम सुरू आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीचे साईबाबा मंदिर हे भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थाननं दिली आहे.

Shirdi Sai baba Gurupurnima Festival
Shirdi Sai baba Gurupurnima Festival (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 9:33 AM IST

शिर्डी Shirdi Sai baba Gurupurnima Festival : शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची आज मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीत बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबांची शिर्डी भक्तांनी गजबजली आहे.

साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सव सुरू (Source - ETV Bharat Reporter)

भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार मंदिर : शिर्डीत शनिवारपासून सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. साईबाबांच्या मंदिरात काल सुरू झालेल्या साईसचरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती आज करण्यात आली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आणि इंग्लिश मिडीअम स्‍कूलचे प्राचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साई संस्थानाकडून गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई समाधी मंदिर रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली.

शिर्डी आणि गुरुपौर्णिमेचं नातं काय? : गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमाही म्हटलं जाते. तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला 1908 साली साईबाबांच्या अनुमतीने सुरू करण्यात आले होते. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर आणि तात्या कोते पाटील तसेच काही भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली होती. तेव्हापासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवाला सुरुवात झाली.

देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो भक्त शिर्डीत : साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त आले आहेत. पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. यावर्षी उत्सवाच्या निमित्तानं साईभक्त सुभा पै. अमेरीका यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर आणि परिसरात केलेल्‍या आकर्षक विद्युत रोषणाईनं साईभक्‍तांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा

  1. गुरुपौर्णिमेला का म्हणतात 'व्यास पौर्णिमा'? जाणून घ्या, गुरुच्या पुजेची पद्धत - Guru Purnima 2024
  2. Live : 'गुरुपौर्णिमा' उत्सवानिमित्त साईनगरी भक्तांनी गजबजली, पहा लाईव्ह दर्शन - Guru Purnima 2024
  3. पंढरपूरमध्ये 12 दिवसात 9 लाख भाविकांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन; आतापर्यंतची सर्वाधिक दर्शनाची नोंद - Vitthal Darshan In Pandharpur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.