मुंबई Shikhar Bank Scam : महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट विरोधात अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी न्यायालयात अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.ॉ
अजित पवारांसह 70 जणांविरोधात आरोपपत्र दाखल : शिखर बँकेनं 2005 ते 2010 या कालावधीत दिलेल्या कर्ज वाटपात राज्यातील सहकारी सूत गिरण्या, साखर कारखाने, इतर कारखाने व इतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आले होते. ही सर्व कर्जे बुडीत खाती जमा झाली. त्यामुळं शिखर बँकेचे संचालक अजित पवार आणि इतर 70 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना या प्रकरणात क्लीन चीट देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र या क्लोजर रिपोर्टला आणि क्लीनचीटला अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला आहे.
क्लोजर रिपोर्टवर आक्षेप : मुंबईतील सत्र न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितलाय. त्यामुळं त्यांची मागणी मान्य करत न्यायालयानं 29 जूनला पुढील सुनावणी ठेवली आहे. अजित पवार यांच्यावर शिखर बॅंके प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले. मात्र, अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिखर घोटाळ्याच्या चौकशीला वेगळं वळण लागलं. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात काही तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा शिखर बँक घोटाळ्याचं प्रकरण चर्चेत आलं आहे.
हेही वाचा :
- ईडी पाठोपाठ मुंबई पोलिसांकडूनही अजित पवारासंह सुनेत्रा यांना क्लिन चिट, शिखर बँकेच्या कथित घोटाळ्यावर काय आहे क्लोजर रिपोर्ट? - shikhar bank scam
- शिखर बँक घोटाळा प्रकरण: आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केला 'क्लोजर रिपोर्ट', न्यायालयाचे तक्रारदाराला 'हे' निर्देश
- शिखर बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर, अजित पवारांना मोठा दिलासा