ETV Bharat / state

शरद पवारांनी नात, जावयासह घेतलं 'लालबागच्या राजा'चं दर्शन - Sharad Pawar Lalbaugcha Raja

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 1:18 PM IST

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (9 सप्टेंबर) 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

Sharad Pawar takes darshan of Lalbaugcha Raja with son in law sadanand sule and grand daughter revati sule
शरद पवारांनी घेतलं 'लालबागच्या राजा'चं दर्शन (ETV Bharat Reporter)

मुंबई Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला लालबाग परिसर सध्या गणेशोत्सवाच्या जयकारानं फुलून गेलाय. लालबाग परिसरात अनेक गणेश मंडळाच्या बाप्पांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून राज्यभरातून गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात. तर सध्या 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योजक आणि दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 'नवसाला पावणारा' गणपती अशा प्रकारची ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून अनेक दिग्गज हजेरी लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (9 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे यांच्यासह 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं.

नात आणि जावयासह गणरायांच्या चरणी नतमस्तक : आज सकाळी शरद पवार हे आपली नात आणि जावयासह 'लालबागच्या राजा'च्या चरणी नतमस्तक झाले. यापूर्वी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना ते 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर कोरोना काळात लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती, तेव्हा मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली होती. त्यामुळं 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्याची शरद पवारांची ही दुसरी वेळ आहे. 'या' नेत्यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन : 'लालबागचा राजा' शनिवारी (7 सप्टेंबर) विराजमान झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील लालबागच्या राजा चरणी हजेरी लावली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेतलं तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत.

हेही वाचा -

  1. 'लालबागच्या राजा'ची पहिल्या दिवशीची दानपेटी उघडली; पहिल्याच दिवशी किती दान? - Lalbaugcha Raja Donation
  2. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात बाप्पाचं ठिकठिकाणी आगमन; पाहा व्हिडिओ - Ganesh Chaturthi 2024
  3. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 'लालबागचा राजा'..."; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर पलटवार - Ashish Shelar on Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.