ETV Bharat / state

"गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं"- शरद पवार - NCP Foundation Day

Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्तानं पुण्यातील पक्ष कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (10 जून) ध्वजारोहण पार पडले. यावेळी शरद पवार यांनी भाजपासह पंतप्रधान मोदींवर टीका केली.

Sharad Pawar Speech On National Congress Party SP 25th Anniversary
शरद पवार (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 1:20 PM IST

शरद पवार भाषण (Source - ETV Bharat reporter)

पुणे Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिन आज (10 जून) मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वतीनं पक्ष कार्यालयात ध्वज फडकावण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत देखील भाष्य केलं.

काय म्हणाले शरद पवार : यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांत दोन व्यक्तींनी सरकार चालवलं. त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही. मात्र, सुदैवानं देशातील जनतेनं याची नोंद घेऊन त्याप्रकारे मतदान केलं. एक-दोन लोकांच्या हातात अधिकार होते. त्याला मर्यादा आणण्यात आल्या. मात्र, असं असलं तरी अद्यापही सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं नाही. पण त्याची प्रक्रिया आता सुरू झालीय. तसंच लवकरच या घडामोडी संपूर्ण देशाला बघायला मिळतील", असा दावाही शरद पवारांनी केला.

...तर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल : पुढं ते म्हणाले की, "मागील 25 वर्ष आपण विचारधारा वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आता मजबुतीनं आपण सर्व हा पक्ष आणखी पुढं घेवून जाण्यासाठी प्रयत्न करुया. तीन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येईल. त्यामुळं आता एकच लक्ष, ते म्हणजे तीन-चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत-जास्त लोकांना शेवटच्या घटकांपर्यंत कसा होईल, याची देखील आपण काळजी घेऊ," असा निर्धार शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणूक निकाल २०२४: शरद पवारांच्या चाणक्य नीतीनं खेचून आणलं यश भाजपाला दिला 'धोबीपछाड' - Lok Sabha Election Result 2024
  2. मतदारांनी वाजवली 'पिपाणी', अनेक ठिकाणी 'तुतारी'ला फटका - Lok Sabha Election Results 2024
  3. राजकारणातील 'तेल लावलेला पैलवान' कोणता टाकणार डाव ? निवडणुकीनंतर शरद पवारांच्या धक्कातंत्राची विरोधकांना धास्ती - Lok Sabha Election Result 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.