ETV Bharat / state

शरद पवारांनी दाऊदला भेटल्याचा खुलासा करावा, ॲड. प्रकाश आंबेडकरांचं आव्हान

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1989 ते 1991 या कालावधीत दाऊदची भेट घेतली होती, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Prakash Ambedkar Press conference
प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद (ETV Bharat File Photo)

मुंबई- विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झालीय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर दाऊदला भेटल्याचा आरोप केला असून, पवारांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1989 ते 1991 या कालावधीत दाऊदची भेट घेतली होती, असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

काय आहेत आरोप? : शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1989 ते 1991 या कालावधीत मुंबई ते इंग्लंड आणि तिथून कॅलिफोर्निया, तसेच कॅलिफोर्नियातून पुन्हा इंग्लंडला येऊन ते दुबईत गेले होते. मुख्यमंत्री असल्याने त्यांना आपल्या दौऱ्याची कल्पना केंद्र सरकारला देणे अपेक्षित होते. त्यांनी तशी कल्पना केंद्र सरकारला दिली होती का? केंद्र सरकारने त्याबाबतचा काही अहवाल सादर केलाय का? या दौऱ्याचा तपशील उपलब्ध आहे का आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिम याची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख आहे का? दाऊद इब्राहिमच्या या भेटीबाबत काय तपशील आहे? हा तपशील शरद पवार यांनी स्पष्ट केला आहे का? असे प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेत.

30 वर्षांनी का झाली आठवण? : ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात उल्लेख केलेल्या या घटनेला आता 30 वर्षे झालीत. 30 वर्षांनंतर या घटनेला आता का उजेडात आणले जात आहे, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले की, जेव्हा माहिती मिळते तेव्हाच ती उजेडात आणली जाते. आपण खासदार असताना संसदेत याबाबत का प्रश्न उपस्थित केला नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, या घटनेची माहिती आता मिळाली असल्याने त्याबाबत त्यावेळी उल्लेख झाला नाहीय. मात्र आता यासंदर्भात शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खुलासा करावा, अशी मागणी केलीय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे आरोप सुरूच राहणार असल्याचं एकंदरीत राजकीय चित्र पाहायला मिळत होते.

हेही वाचा :

  1. नवनियुक्त आमदार हेमंत पाटील यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
  2. इकडं आड, तिकडं विहीर : शिवसेनेच्या आमदारांना अस्तित्वाची लढाई, 'या' मतदार संघात भाजपाचा उघड विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.