ETV Bharat / state

झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांचा आक्षेप; सुरक्षेतही काय चाललंय राजकारण? वाचा स्पेशल रिपोर्ट - objection on Z Plus security

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 12:52 PM IST

Updated : Aug 31, 2024, 1:05 PM IST

objection on Z Plus security : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली झेड प्लस सुरक्षा अंशतः नाकारली आहे. तर पवारांनी घेतलेला आक्षेप हास्यास्पद असून प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

शरद पवार
शरद पवार (Etv Bharat)

मुंबई Objection on Z Plus security : केंद्रीय गृहमंत्र्यांकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना असलेला धोका लक्षात घेता त्यांनाही सुरक्षा देण्यात येत असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात शरद पवार यांना 15 ऑगस्ट रोजी पत्र पाठवण्यात आलं होतं, तर शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची बैठक झाली. या बैठकीला सीआरपीएफ चे महासंचालक कमलेश सिंह, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल तसंच इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी उपस्थित होते. शरद पवार यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ती वाढवून त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. शरद पवारांना असलेल्या धोक्यामुळे ही सुरक्षा वाढवली असल्याचं केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केलं. हा निर्णय का घेण्यात आला याची माहिती शरद पवार यांना देण्यात आली. तसंच पवार यांच्या निवासस्थानाच्या भितींची उंची वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. एकूणच पवार यांना गंभीर धोका असल्याचं चित्र या बैठकीत मांडण्यात आलं.

म्हणून पवारांनी नाकारली सुरक्षा - झेड प्लस सुरक्षेनुसार शरद पवार यांच्या भोवती रात्रंदिवस 50 जवानांचा गराडा असणार आहे. त्यांना घरामध्ये आणि घराबाहेर सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यांनी स्वतःचे वाहन न वापरता सीआरपीएफच्या वाहनाचा वापर करावा आणि या वाहनात दोन सुरक्षारक्षक कायम तैनात असतील असं प्रस्तावित आहे. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून याच्यामध्ये आपल्या जीविताच्या धोक्याचे कारण जरी दिले जात असले तरी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी ही यंत्रणा कामाला लावली आहे का? अशी शक्यता पवारांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी आपल्या घरामध्ये आणि आपल्या वाहनांमध्ये सुरक्षा रक्षक नकोत असे थेट सांगितलं आहे. तसंच सीआरपीएफच्या वाहनाचाही वापर करण्यास नकार दिला आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे आपल्यावर पाळत ठेवून आपली सगळी माहिती मिळवण्याचा हा एक वेगळा प्रयत्न असल्याचं पवारांचं म्हणणं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, "पवार साहेबांनी विचारपूर्वकच काही विचार मांडला असेल, जर अशा पद्धतीने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी पाळत ठेवत असेल तर एक प्रकारे सुरक्षा पुरवून त्यांना नजर कैदच करण्याचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका उपस्थित होते." मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पवार साहेबच घेतील, असंही ते म्हणाले.

हा राजकीय निर्णय नसावा-अशोक चव्हाण - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, हा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय घेताना त्यांनी काही बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला असावा. त्यामुळे या निर्णयात काही राजकीय हस्तक्षेप असावा असं प्रथम दर्शनी वाटत नाही. आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा स्वीकारायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांचा आहे. मात्र यात काही राजकीय हेतू असेल असं आता तरी वाटत नाही, असं चव्हाण यांचं म्हणणं आहे.

शरद पवारांचं वागणं हास्यास्पद -आ. भातखळकर - झेड प्लस सुरक्षा देऊन आपल्यावर नजर ठेवली जात आहे, असं शरद पवार यांचं म्हणणं अत्यंत हास्यास्पद आणि खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलीय. एखाद्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवायची याचा निर्णय हा केंद्राच्या किंवा राज्याच्या अधिकाऱ्यांची समिती घेत असते. या संदर्भात सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आलेली असते या समितीकडे येणाऱ्या माहितीच्या आधारे ही समिती कोणत्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवणं गरजेचं आहे, याचा निर्णय घेत असते. शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बाबत काही माहिती जर या समितीकडे आली असेल, तर त्या दृष्टीनं त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे. याची माहिती स्वतः शरद पवार यांनासुद्धा आहे. मात्र, केवळ महाविकास आघाडीचे नेते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आता राजकारण करत आहेत. आपल्यावर नजर ठेवली जात आहे. आपल्या हालचाली टिपल्या जाव्यात याच्यासाठी हा निर्णय घेतलाय, हे पवार यांचं म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे, असंही ते म्हणाले.

सुरक्षा नाकारल्याचा अद्याप निर्णय नाही-डॉ. कोल्हे - "शरद पवार यांना पुरवण्यात आलेली झेड प्लस दर्जाची सुरक्षा ही स्वीकारायची की नाही, हा निर्णय पवार साहेब स्वतः घेणार आहेत. त्यांनी अद्याप ही सुरक्षा नाकारलेली नाही. यासंदर्भात दोन दिवसाचा कालावधी त्यांनी मागून घेतला असून दोन दिवसात आपण याबाबतचा निर्णय घेऊ, असं त्यांनी यंत्रणांना कळवलं आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार या संदर्भातला निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यावर बोलणं उचित नाही." असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी काही मुद्द्यांवर जरी सुरक्षा यंत्रणेवर आक्षेप घेतला असला तरी शरद पवार यांना सुरक्षा यंत्रणांनी पुरवलेल्या माहितीमुळे त्यांनी सध्या तरी ही सुरक्षा अंशतः नाकारली आहे. त्यांनी स्वतःच हालचालींवर लक्ष ठेवण्याची शक्यता व्यक्त केल्याने सुरक्षेच्या विषयावर मात्र राजकारण ढवळून निघालं.

हेही वाचा..

  1. "...तर तुमची झेड प्लस सुरक्षा काढण्यात येईल"- केंद्रावरील टीकेनंतर प्रसाद लाड यांचा शरद पवारांवर निशाणा
  2. शरद पवारांना केंद्राची Z+ सुरक्षा; नेमके कारण काय

Last Updated : Aug 31, 2024, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.