ETV Bharat / state

"ईडीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न"; शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 1:29 PM IST

Sharad Pawar in Solapur : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं नोटीस बजावलीय. यावरुन शरद पवारांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.

Sharad Pawar in Solapur
Sharad Pawar in Solapur

सोलापूर Sharad Pawar in Solapur : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ईडीवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावरुनही निशाणा साधलाय. ते आज सकाळी सोलापुरात बोलत होते.

केंद्रीय संस्थांचा हत्यार म्हणून वापर : आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीची नोटीस आली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "केंद्रीय संस्था ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करतंय. एकच सरकार सत्तेत असल्यानं ईडीचा वापर करत, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. सरकार ईडीची भीती विरोधकांना दाखवतंय. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात घातलं, संजय राऊत यांना नोटीस बजावली, ईडीचा वापर ही सरकार हत्यार म्हणून करतंय."

रे नगर गृहप्रकल्पाचा संपूर्ण श्रेय आडम मास्तरांना : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्घाटनासाठी सोलापूरला आले होते. त्यांच्या या दौऱ्यावर टीका करत ते म्हणाले, "रे नगर गृहप्रकल्पाचं सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जातं. मात्र मोदींनी किंवा भाजपानं श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. मोदी सोलापुरात येऊन रे नगर गृहप्रकल्पाचा उद्घाटन करुन गेले. व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत. महागाई जबरदस्त वाढलीय. या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत."

अजित पवारांच्या भाषणाकडं जास्त लक्ष देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात शरद पवारांच नाव न घेता टीका केली होती. वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत, अशी खंत अजित पवार यांनी भाषणातून व्यक्त केली होती. शरद पवारांनी अजित पवारांच्या भाषणाला प्रतिउत्तर देत म्हटलंय, "अजित पवार हे तरुणच होते. त्यांना संधी कुणी दिली. त्यांच्या भाषणाकडं जास्त लक्ष द्यायचं नाही."

हेही वाचा :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेगा प्रोजेक्टचं उद्घाटन; म्हणाले 'माझं आणि सोलापूरचं जुनं नातं'
  2. सोलापूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, पाहा काय म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.