पुणे Sharad Pawar health issue : राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा रविवारी (5 मे) रोजी प्रचार संपला. बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी रविवारी 3 ठिकाणी सभा घेतल्या आहेत. यापूर्वी शरद पवार यांनी लोकसभेसाठी राज्यभरात सभा घेतल्या आहेत. सततच्या दगदगीमुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आलीय.
-
साहेब ८४ व्या वर्षी ५०+ सभा घेताय...
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 5, 2024
साहेबांची टिंगल करणाऱ्यांनाही साहेबांसारखे उदंड आयुष्य लाभो व ताठ मानेने किमान ५० पावलं चालण्याची शक्ती लाभो !
आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द : सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सगळीकडं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यभरात जवळपास 58 हून अधिक सभा घेतल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटचा दिवशी त्यांना थकवा जाणवत होता. सततच्या सभांमधील भाषणामुळं त्यांचा घसा बसला होता.
किमान 50 पावलं चालण्याची शक्ती लाभो- राष्ट्रवादीचे (NCP SP ) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ बारामतीत रॅलीला संबोधित करताना शरद पवार यांचा घसा बसला. राष्ट्रवादीचे (NCP SP) अध्यक्ष बारामती येथील त्यांच्या घरी विश्रांती घेणार आहेत. त्यांनी एक्स मीडियात पोस्टमध्ये म्हटले, " साहेब 84 व्या वर्षी 50हून सभा घेत आहेत. साहेबांची टिंगल करणाऱ्यांनाही साहेबांसारखे उदंड आयुष्य लाभो. ताठ मानेनं किमान 50 पावलं चालण्याची शक्ती लाभो !"
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं शरद पवार यांनी वक्तव्य करत राज्यभरात सभा घेतल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरात सभा घेतल्या आहेत. बारामती मतदारसंघात त्यांची कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत त्यांच्या पुतण्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होत आहे. 7 मे रोजी राज्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 11 लोकसभेच्या जागांपैकी बारामतीचा समावेश आहे. बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'साताऱ्याची निवडणूक...' - Lok Sabha Election 2024
- हेमंत करकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar
- शिव महापुराण निमित्त निघालेल्या कलश यात्रेत महिलेचा मृत्यू; परतवाडा येथील घटना - Woman Dies Due To Sunstroke