सातारा Shambhuraj Desai Son Wedding : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र तथा लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचा आज मरळी (ता. पाटण) इथं विवाह सोहळा होत आहे. या विवाह समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हजेरी लावणार आहेत.
राज्य तसंच केंद्रातील अनेक मंत्री राहणार उपस्थित : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांच्या विवाहासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसंच राज्य सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर, संजय बनसोडे, दादा भुसे, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
- तीन हेलीपॅडची सोय : साताऱ्यात होणाऱ्या लग्न सोहळ्याला केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्री येणार असल्यानं मरळी (ता. पाटण) इथं वेगवेगळ्या ठिकाणी तीन हेलिपॅडची सोय करण्यात आलीय. यासोबतच मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आलाय. तसंच नजीकच्या जिल्ह्यातूनदेखील पोलीस फौजफाटा मागविण्यात आलाय.
संपूर्ण पाटण तालुक्याला लग्नाचं निमंत्रण : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, पोलादी पुरुष तथा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कुटुंबात चौथ्या पिढीतील विवाहाचे सनई चौघडे वाजत आहेत. लोकनेत्यांचे नातू, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात साखर कारखान्याच्या चेअरमन पदापासून झाली होती. शंभूराज देसाई हे आशियातील सर्वात तरुण चेअरमन ठरले होते. त्याप्रमाणे शंभूराज यांचे सुपुत्र यशराज देसाई हेदेखील कमी वयात कारखान्याचे चेअरमन झाले. यशराज यांच्या विवाहाचे संपूर्ण पाटण तालुक्याला निमंत्रण देण्यात आले आहे.
हेही वाचा :