ETV Bharat / state

मुंबई-मॉरिशस विमानामधील AC बंद पडल्यानं प्रवाशांना श्वसनाचा त्रास; उड्डाणापूर्वीचा प्रकार

Mumbai to Mauritius Flight : मुंबई-मॉरिशस विमानामधील AC बंद पडल्यानं प्रवाशांना श्वसनाचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आलाय. विमान उड्डाणापूर्वीच हा सर्व प्रकार समोर आलाय. यानंतर विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलंय.

Mumbai to Mauritius Flight
मुंबई-मॉरिशस विमानामधील AC बंद पडला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 10:40 AM IST

Updated : Feb 24, 2024, 1:39 PM IST

मुंबई Mumbai to Mauritius Flight : एअर मॉरिशस कंपनीच्या मुंबई ते मॉरिशस फ्लाइट MK749 मधील अनेक लहान मुलांसह वयोवृद्ध प्रवाशांना विमानातील एसी काम करत नसल्यामुळं श्वसनाचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आलाय. आज पहाटे साडेचार वाजता विमान मुंबई विमानतळावरुन मॉरिशसला निघणार होतं. त्यावेळी विमानातील प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.

प्रवासी पाच तास होते विमानात अडकून : मुंबई ते मॉरिशस हे विमान मुंबई विमानतळावरुन आज उड्डाण करण्यासाठी तयार होतं. त्यासाठी पहाटे ३.४५ वाजता प्रवाशांचं बोर्डिंग करण्यात आलं. पण विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली आणि आतील एसी बंद झाले. त्यामुळं प्रवाशांना त्रास जाणवू लागला होता. प्रवाशांना खाली उतरण्याची परवानगी नसल्यानं, प्रवासी 5 तासांहून अधिक काळ विमानातच अडकून राहिले.

विमान उड्डाण रद्द : घडलेल्या सर्व प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेता विमान कंपनीनं हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, विमानतळावर प्रवाशांसाठी इतर आवश्यक व्यवस्था केली जात असल्याची माहिती मिळत आहे. घडलेल्या प्रकारानंतर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. श्वसनाचा त्रास झालेल्यांमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

रनवेवरच प्रवासी बसले जेवायला : मिळालेल्या माहितीनुसार, एअर मॉरिशसच्या मुंबई ते मॉरिशस फ्लाइट एमके ७४९ विमानातील एसी काम करत नसल्यानं लहान मुलांसह एका ज्येष्ठ व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. एका प्रवाशानं दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट रद्द करण्यात आली असून इतर आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत. या घटनेबाबत एअरलाइनकडून अजून अधिकृत माहिती याबद्दल देण्यात आली नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून मुंबई विमानतळ हे विविध कारणांमुळ कायमच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी विमान धावपट्टीवरच काही प्रवाशी जेवताना बसल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

हेही वाचा -

  1. इंडिगो विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
  2. विस्ताराच्या दुबई फ्लाइटचे प्रवाशी अचानक पोहोचले मुंबई विमानतळावर, नेमकं प्रकरण काय?
  3. दरभंगाहून दिल्लीला जाणार्‍या स्पाईसजेटच्या विमानाला बॉम्बनं उडवण्याचा फोन; विमानतळावर हाय अलर्ट

Last Updated : Feb 24, 2024, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.