ETV Bharat / state

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य दादर रेल्वे स्थानकावर येणार, दारूच्या नशेत पोलिसांना केला हॉक्स कॉल - Kalyan GRP Police - KALYAN GRP POLICE

Hoax Caller Arrested : लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हस्तक दादर स्टेशनवर येणार असून मोठी घटना घडणार आहे, अशा स्वरूपाचा हॉक्स कॉल करणाऱ्या व्यक्तीस मुंबईतील कल्याण जीआरपीने वालधुनी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर कलिंगा वामने (वय ४५) असं आरोपीचं नाव आहे. त्याला दादर जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Hoax Caller Arrested
हॉक्स कॉलर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:00 PM IST

मुंबई Hoax Caller Arrested : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास हॉक्स कॉल करणाऱ्या आरोपीस कल्याण जीआरपीने कल्याण परिसरातील वालधुनी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि आज दुपारी दादर जीआरपीच्या (मध्य रेल्वे) ताब्यात अटकेच्या कारवाईसाठी सुपूर्द केले आहे. चंद्रशेखर कलिंगा वामने (वय ४५) या आरोपीला दादर जीआरपीने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दादर जीआरपीचे पोलीस अधिकारी अनिल कदम यांनी दिली आहे.

पोलीस आले अलर्ट मोडवर : काल मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास कॉल करून लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हस्तक दादर स्टेशनवर येणार असून मोठी घटना घडवून आणणार असल्याची माहिती दिली. या कॉलनंतर मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आणि ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता त्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली. यावेळी मोबाईलधारक कल्याणच्या वालधुनी परिसरात असल्याचे आढळून आले. त्यावर कल्याण जीआरपी यांना माहिती कळवून आरोपी चंद्रशेखर वामने याला त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेतले.

दारू पिऊन पोलीस नियंत्रण कक्षाला फोन : आरोपी चंद्रशेखर वामने याचे लग्न झालेले आहे. मूळचा उस्मानाबादचा असलेल्या चंद्रशेखर वामने याला दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी सोडून माहेरी गेली असल्याची माहिती कल्याण जीआरपीने दिली आहे. पत्नी सोडून गेल्यानंतर आरोपी चंद्रशेखर वामने हा तणावाखाली होता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. जेव्हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास चंद्रशेखरने हॉक्स कॉल केला, तेव्हा तो मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच चंद्रशेखर वामने याने दारूची नशा करून यापूर्वी देखील मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल केला होता, अशी माहिती देखील समोर येत आहे. वामने याचे बिष्णोई गँगशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपीने नैराश्यातून केला हॉक्स कॉल : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक सदस्य सकाळी 10 वाजता मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर येणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर वामने यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दिली. पुढं फोन करणाऱ्यानं ती व्यक्ती लाल शर्टमध्ये असल्याचं सांगितलं होतं. म्हणून मुंबई पोलिसांच्या पथकातील काही पोलीस दादर पोलीस रेल्वे परिसरात लाल टीशर्ट परिधान करूनच आज सकाळी शोध मोहीम राबवली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपी चंद्रशेखर वामने याच्या विरोधात दादर-मध्य रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम १८२, ५०५(१)(ब) आणि ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करून सीआरपीसी ४१(१)(अ) ची नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. सोमवारी न्यायालयात हजर करण्यासाठी आरोपीला बोलवण्यात आले आहे. आरोपीने नैराश्यातून हा हॉक्स कॉल केला असल्याची माहिती दादर-मध्य रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. देशाच्या आर्थिक राजधानीवर पाणी संकट; 'या' दिवशी गोरेगाव विभागाचा पाणीपुरवठा होणार 24 तासांसाठी बंद - BMC Water Supply
  2. 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
  3. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'; संदीपान भुमरेंना उमेदवारी - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.