पालघर : पालघरमधील वांदिवली इथं सानिधानम या आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांना मानसिक आणि शारीरिक आधार दिला आहे. मुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावरील या आश्रमाचं व्यवस्थापन डॉ. सुमीत कटारिया, शोभा सचदेव हे करतात. येथे अठरा वर्षावरील दिव्यांगांना, तसंच साठ वर्षावरील जेष्ठांना राहण्यासह अन्य सुविधा दिल्या जातात. सानिधानममध्ये 'माझ्या नंतर काय', 'माझी कोण काळजी घेईल,' 'वृद्ध झाल्यानंतर माझं जीवन कसं असेल' अशा प्रश्नांचा विचार करुन सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. एका छताखाली अनेक व्यक्तींना तिथं आश्रय देण्यात आला आहे.
पालक वृद्ध झाले, की त्यांना आपल्या सेलेबल पाल्सी झालेल्या मुलांचं काय करायचं? असा प्रश्न पडतो. त्यांची चिंता आम्ही आता दूर केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आधार नसतो. साठ टक्के सेलेबल पाल्सी झालेल्यांना 40 टक्के ज्येष्ठ नागरिकांना येथे प्रवेश दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांना आधार नसतो. ते येथील मुलांत आपली मुले पाहतात. मुले आणि पालक या दोघांनाही एकमेकांचा आधार मिळतो. येथे सेलेबल पाल्सी मुले यांना योग्य आहार दिला जातो. डॉ. सुमीत कटारिया -संचालक
दिव्यांगांसाठी आश्रयस्थानं कमी : देशात एकूण लोकसंख्येच्या 2.21 टक्के लोक दिव्यांग आहेत. त्यातील तीस टक्के लोक शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत. अशा परिस्थितीत मुंबई आणि परिसराचा विचार केला, तर मुंबई परिसरात फक्त सहा ते सात आश्रयगृहं आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं या गोष्टीकडं लक्ष देत सरकारी मदतीनं काही दिव्यांगांसाठी आश्रयस्थान निर्माण व्हायला हवीत, अशी अपेक्षा येथील दिव्यांग नागरिकांनी व्यक्त केली. तसंच, येथील व्यवस्थापनानंही सरकारनं यामध्ये लक्ष घातलं तर आणखी दिव्यांगांसाठी मदत नक्कीच करता येईल, अशी आशा व्यक्त केली.
युनिक मॉडेल : या पार्श्वभूमीवर 'सनीधानम'नं एक युनिक मॉडेल तयार केलं आहे. यामध्ये सेरेब्रल पाल्सीं अर्थात जन्मता मेंदूला होणारा पक्षाघात या आजारातील रुग्ण, दिव्यांग तसंच, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन घरं तयार करण्यात आली आहेत. प्रेम, काळजी आणि सुरक्षितता यांचा विचार येथे करण्यात आला आहे. भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन तशा प्रकारच्या सुविधा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना पुरवण्यात आल्या आहेत. त्यांची निवासी व्यवस्था, जोडीदार, काळजीवाहक आणि औषधाची उपलब्धताही करुन दिली जात आहे. त्यांचं जीवन चांगलं व्हावं, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा :
1 मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी 'असं' सुरू आहे सर्वेक्षण; 'ईटीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट
3 मराठा आरक्षणासाठी सरकारचा नवा अध्यादेश; मनोज जरांगेंशी करणार चर्चा