ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील दरोडा; जबरी चोरीचे २६ गुन्हे उघड, दोन चोरट्यांकडून केले ५४ तोळ्याचे दागिने हस्तगत - Satara Crime News - SATARA CRIME NEWS

Satara Crime News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन २६ गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा पोलिसांना यश (Satara Police) आलं आहे. तसेच संशयिताकडून ५४ तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. संशयितांमधील एकजण अल्पवयीन आहे.

Satara Crime News
सातारा जिल्ह्यात चोरीचे २६ गुन्हे उघड (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 9:11 PM IST

सातारा Satara Crime News : ज्येष्ठ नागरिकांसह महिलांवर हल्ले करुन चोरी करणाऱ्या फलटण तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेने १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडीसह एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यातील ३९ लाखांचे ५४ तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक समीर शेख (ETV BHARAT Reporter)

मारहाण करुन लुटले दागिने : सातारा तालुक्यातील मालगाव येथे आक्टोबर २०२३ मध्ये वृध्द दाम्पत्याला जबर मारहाण करून शेतातील घरावर दरोडा टाकण्यात आला होता. तसेच लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून २०२४ मध्ये दोन महिलांना जबर मारहाण करुन दागिने लुटण्यात आले होते. या गुन्ह्यांचा छडा लावण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. दोन्ही गुन्हे रेकॉर्डवरील आरोपी शेख सुरेश भोसले (रा. खामगांव ता. फलटण, जि. सातारा) याने त्याच्या साथीदारासह चोरी केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली.

२६ गुन्ह्यांची दिली कबुली : संशयित आरोपी हा फलटण भागात असल्याची माहिती मिळताच एसीबीच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने फलटण भागात सापळा रचून, आरोपीवर पाळत ठेवून आरोपी शेख सुरेश भोसले आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासात संशयितांनी २६ गुन्ह्यांची कबुली दिली.

५४ तोळ्याचे दागिने केले हस्तगत : चोरीस गेलेल्या दागिन्यांपैंकी ३९ लाख ९ हजार रुपये किंमतीचे ५४ तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. आरोपींकडून चोरीचे सोने विकत घेणारा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. मात्र, तो फरार झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईची माहिती, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईबद्दल एसीबीच्या पथकाचं त्यांनी कौतुक केलंय. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ पासून आज अखेर चोरीच्या गुन्ह्यातील ५ कोटी ५ लाख रुपये किंमतीचे ७ किलो दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

हेही वाचा -

  1. साताऱ्यातील घरफोडीच्या पाच गुन्ह्यांत सोनारासह चौघांना अटक; 25 लाखांचे 35 तोळे दागिने हस्तगत - Crime News
  2. मिनी काश्मिरात गावठी बंदुकीनं पिसोरी हरणाची शिकार; बंदुकीसह काडतूस, कोयता जप्त, चौघांवर गुन्हा दाखल - Satara Crime News
  3. सातारात २३ लाख रुपये किंमतीची ११3 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.