ETV Bharat / state

इमारतीवरुन ढकलून प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप ; न्यायालयानं हरियाणाच्या प्रियकराला ठोठावली पोलीस कोठडी - MBBS Student Murder Case - MBBS STUDENT MURDER CASE

MBBS Student Murder Case : दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याच्या संशयातून प्रियकरानं प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी हरियाणाच्या प्रियकरावर कराड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रियकराला न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

MBBS Student Murder Case
प्रियकराला नेताना पोलीस (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 6:47 AM IST

Updated : Aug 3, 2024, 8:48 AM IST

सातारा MBBS Student Murder Case : दुसऱ्या मुलाशी अफेअर असल्याच्या संशयावरुन भावी डॉक्टर प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून देत तिची हत्या केल्याचा पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराला शुक्रवारी कराड पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी प्रियकराला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हत्या करण्यात आलेली प्रेयसी ही बिहारमधील तर प्रियकर हरियाणाचा रहिवासी आहे. हे दोघंही कराड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

वाद विकोपाला गेल्यानंतर प्रेयसीला दिलं ढकलून : मृत तरुणी ही मूळची बिहारमधील मुजफ्फरपूरची रहिवासी होती. सध्या ती कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. तर तिचा प्रियकर हा देखील वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. तो मलकापुरातील सनसिटीमध्ये राहातो. सोमवारी त्यानं प्रेयसीला त्याच्या फ्लॅटवर बोलवलं. त्याची प्रेयसी फ्लॅटवर गेल्यानंतर सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानं प्रियकरानं तिला गॅलरीतून ढकलून दिलं, असा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यानं त्याच्या प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला.

संशयितास तीन दिवस पोलीस कोठडी : प्रेयसी तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची चर्चा अगोदर शहरात करण्यात येत होती. मात्र त्यानंतर तिच्या प्रियकरानंच तिला ढकलून देत तिची हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी तरुणीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या प्रियकरावर कराड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेवेळी प्रियकराच्या पायाला इजा झाली आहे. त्याच अवस्थेत त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयानं त्याला तीन दिवस कोठडी ठोठावली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मला काही सांगायचंय : रिमांडची सुनावणी झाल्यानंतर संशयित प्रियकरानं आपल्याला काही सांगायचं असल्याची विनंती न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायाधीशांनी सर्वांना कोर्टातून बाहेर जाण्यास सांगितलं. मग या घटनेतील संशयित प्रियकरानं एकांतात आपलं म्हणणं न्यायाधीशांसमोर मांडलं. त्यानं नेमकं काय सांगितलं, हे मात्र समजू शकलं नाही.

हेही वाचा :

MBBS Student Suicide : नैराश्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिले भावनिक पत्र

इमारतीवरून ढकलून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, गुन्हा दाखल - boyfriend killed girlfriend

Last Updated : Aug 3, 2024, 8:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.