ETV Bharat / state

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्याकडं प्रस्थान; राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती - Ashadhi Wari 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 3:15 PM IST

Ashadhi Wari 2024 : आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचं पिंपरी-चिंचवडकरांनी स्वागत केलं.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 (ETV Bharat)

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान (ETV Bharat)

पुणे Ashadhi Wari 2024 : आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं आहे. या पालखीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. उद्योगनगरीतील पाहुणचार घेऊन वारकरी मंडळी हातात टाळ चिपळ्या, मृदंगाचा निनादात तालावर ताल धरत तुकाराम- तुकाराम नामाचा अखंड जयघोष करत होते. या हरिनामाच्या जयघोषानं संपूर्ण कामगारनगरीत आसमंत खुलून निघालं. अशा या भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडं प्रस्थान झाली.

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान :भक्तीमय वातावरणात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं उद्योग नगरी म्हणून ओळखलं जाणारं पिंपरी चिंचवड शहर दुमदुमुन गेलं. पालखी पिंपरीतील एचए कॉलनीत पहिली विश्रांती घेईल. दरम्यान कासारवाडी इथं दुसरी विश्रांती, तर दुपारच्या जेवणासाठी पालखी दापोडी इथं थांबेल. त्यानंतर पालखी शिवाजीनगरकडं प्रस्थान करेल.

ज्ञानोबा माउली तुकारामचा होणारा जयघोष : पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगाचा नाद, हाती घेतलेली एकतारी वीणा आणि चिपळ्या यांच्या सुरांवर ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष झाला. डोईवर तुळशी वृंदावन आणि मुखी विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करत महिला मोठ्या उत्साहानं वारीत सहभागी झाल्या. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामानामुळे आलेली सावली अशा वातावरणात वारकऱ्यांचा तसूभरही उत्साह कमी झाला नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचं पिंपरी-चिंचवडकरांनी स्वागत केलं.

वाहतुकीत होणार 'असा' बदल : संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आगमनानिमित्तानं रविवारी आवश्यकतेनुसार बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई - पुणे मार्गावरुन पुण्याकडं येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनानिमित्तानं कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवड्यातील मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील. या कालावधीत फक्त आळंदीकडं जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहणार असून, अन्य रस्ते सुरू राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केलं.

हेही वाचा

  1. "छंद असलेल्या गोष्टींमध्ये आयुष्य घडविलं तर..." नाव न घेता उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis News
  2. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्र्यांनी घेतलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन - Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
  3. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या 'सुपरफास्ट प्रवासात' नवं संशोधन! एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली हायपरलूपची निर्मिती - Hyperloop technology research

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.