ETV Bharat / state

संजय राऊत यांना स्किझोफ्रेनियाची लक्षणे - विजय शिवतारे - Sanjay Raut

Sanjay Raut symptoms of schizophrenia : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील सभेवर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी खासदार राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. संजय राऊत यांना स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसतात, त्यांना रात्री स्वप्नं पडतात. त्यामुळं ते दुसऱ्या दिवशी काय बोलतात हे त्यांना कळत नसल्याचा टोला शिवतारेंनी राऊतांना लगावला आहे.

Vijay Shivtare
विजय शिवतारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 4:00 PM IST

विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया

पुणे Sanjay Raut symptoms of schizophrenia : पुरंदर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधानांचा औरंगजेब असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर पुरंदरचे माजी आमदार तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत यांना स्किझोफ्रेनियाची लक्षणं आहेत. त्यामुळं त्यांना रात्री स्वप्नं पडतात, मात्र दुसऱ्या दिवशी ते काय बोलतात हे त्यांना कळत नाही, असा टोला शिवतारेंनी राऊतांना लगावला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मोदींच्या सभेमुळं पुणेकर खूश : विजय शिवतारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं जिथं सभा घेतात, तिथं SPG सुरक्षा कडेकोट असते. हजारो लोक सभेच्या बाहेर उभे राहून भाषण ऐकत होते. पुण्यात मोठी सभा झाली त्यावेळी मोदींनी विकासावर भाष्य केलं. कालच्या सभेनं पुणेकर खूश आहेत. काही विरोधक सभेला माणसं पाठवून सभा सोडून जातात. त्यावेळेचं चित्रिकरण विरोधकांचे कॅमेरामन करतात. पुण्यात एक लाख लोकांची सभा विरोधकांनी घेऊन दाखवावी, असं आव्हान विजय शिवतारे यांनी विरोधकांना दिलं आहे.

विरोधकांची दुकानदारी कशी चालणार : कालच्या सभेला उत्साही लोक उपस्थित होते. नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी आले होते. नाना पटोले खोटे आरोप करतात. विरोधक आरोप करत नाहीत, तर त्यांची दुकानदारी कशी चालणार, असं म्हणत शिवतारे यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भटकणारा आत्मा हे सर्वसाधारण विधान होतं. कुणी कुणाला टार्गेट केलं, असं म्हणणं चुकीचं आहे. कालपासून भटकत्या आत्म्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली, असं म्हणणं चुकीचं असल्याचंही शिवतारे म्हणाले.

संजय राऊतांना आव्हान : आमची सभा सासवडला झाली. तिथं हजारो लोकांची गर्दी होती. संजय राऊत यांना माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवा. संजय राऊत यांना स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसत आहेत. सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात आघाडी घेणार आहेत. ही निवडणूक भावकी, गावकऱ्याची नाही, ही लढाई मोदी, राहुल गांधी यांच्यात असल्याचंही शिवतारे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. विरोधकांकडून फेक व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप - PM Modi Dharashiv visit
  2. अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरण; निराशेतून काँग्रेसची पातळी घसरली, अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Amit Shah Fake Video
  3. तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.