ETV Bharat / state

टोलनाक्यांची मुदत संपायच्या आधीच टोलमाफी; संजय राऊतांचा टोलमाफीला विरोध

टोलमाफीच्या संदर्भात जो निर्णय झालाय, तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे. टोलनाक्याची मुदत संपायच्या आधीच टोलमाफी केली गेलीय, असं म्हणत संजय राऊतांनी टोलमाफीला विरोध केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat File Photo)

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात. त्यावरूनच संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. या निवडणुकीच्या तारखा सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार ठरवून घेतल्यात. या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री या सर्वांनी आपल्या सोयीनुसार तारखा ठरवल्यात. जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका झाल्यात, तेव्हाही निवडणुका घेता आल्या असत्या. पण तसे न करता यांनी 20 तारखेला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी ठेवली आहे, परंतु 23 तारखेला नवीन सरकार येणार असून, ते महाविकास आघाडीचे असेल, यात अजिबात शंका नाही, असा विश्वास शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलाय. दरम्यान, या निवडणुकीनंतर मिंधे गट आणि अजित पवार यांचा खेळ संपेल. भारतीय जनता पक्ष मदारी आहे आणि इतर सगळी माकडं आहेत. भाजपा या माकडांना आपल्या तालावर नाचवूण सोडून देणार असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय. आज त्यांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

शाहांनी महाराष्ट्रावर सूड उगवला : एकनाथ शिंदेंसाठी आमच्या माणसांनी त्याग केला, असं अमित शाहांनी म्हटलंय, यावर बोलताना राऊत म्हणाले की, अमित शाहांनी त्याग वगैरे काही केला नाही. त्यांनी शिंदे गटाचा वापर करत त्यांना हाताशी धरून महाराष्ट्रावर सूड उगवलाय. महाराष्ट्रावर हल्ला केलाय, महाराष्ट्राची लूट केलीय. भाजपा पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्याग, बलिदान हे शब्द अजिबात शोभत नाहीत, तो त्या शब्दांचा अपमान आहे, असंही संजय राऊत म्हणालेत. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे प्रादेशिक अस्मितेचे पक्ष फोडले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना काही दिवस जुळवून घेण्यास सांगितले. याला त्याग नाही तर याला स्वार्थ म्हणतात, असं म्हणत जी महाराष्ट्राची लूट केली त्याला त्याग म्हणणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्याग आम्ही पाहिलेला आहे. सरकारकडून त्यांनी 50 कोटींची जमीन ओरबाडून घेतली. कवडीमोल भावात सरकारकडून त्यांनी जमीन ओरबाडलेली आहे. हा त्याग आहे का? अशी टीका राऊतांनी अमित शाहा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलीय.

जागावाटपावर लवकरच निर्णय : महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येईल. आज आणि उद्या दोन दिवस बैठकांचं सत्र चालू राहील. दोन दिवसांमध्ये बरंच चित्र स्पष्ट झालेलं असेल. जागा वाटपासंदर्भामध्ये ताबडतोब हालचाली व्हाव्यात, असं आम्हाला तिन्ही पक्षांना वाटतंय. माननीय शरद पवार साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा आग्रह आणि काँग्रेस नेत्यांचासुद्धा आता आग्रह आहे की, आपण आता वेगाने काम केलं पाहिजे. त्यामुळं जागावाटपावर लवकरच निर्णय होईल, असंही संजय राऊत म्हणालेत.

खोकेवाल्यांना घालवायचंय : पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमची निवडणुकीसाठी तयारी झाली असून, आमचा प्रचारही सुरू झाला आहे. प्रचार हाच आहे की, गद्दारांना आता थारा नाही. खोकेबाज सरकारला आता घालवायचंय. ज्या गद्दारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला, शिवसेना पक्षाशी गद्दारी केली, अशा गद्दारांना आणि खोकेबाजाने आता हद्दपार करायचंय. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय की ह्यांना आता घालवायचंय. ते लवकरच पाहायला मिळेल, हाच आमचा प्रचार असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

टोलमाफीचा मोठा घोटाळा : निवडणुकीच्या धरतीवर मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5 टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आलीय. हा योजना अन् निर्णयाचा पाऊस आहे. पण मला वाटतं हा कोरडा पाऊस आहे, ढग गडगडले, पण पाणीच नाही, असं आहे. टोलमाफीच्या संदर्भात जो निर्णय झालाय, तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे. टोलनाक्याची मुदत संपायच्या आधीच टोलमाफी केली गेलीय. त्यामुळं टोल कंपन्यांची जी रक्कम असेल तिचा परतावा करावा लागणार आहे आणि त्यातले 50 टक्के हे मिंधे, भाजपा आणि अजित पवारांची यांच्या वाटेला जातील. या पैशांचा वापर निवडणुकीसाठी होईल हे सूत्र ठरलेलं आहे. राज्याच्या तिजोरीतून हे पैसे आता त्या टोल कंपन्यांना द्यावे लागतील, अशी माझी माहिती आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

हिंदूचा गब्बर आहे कुठे?: आचारसंहिता लागण्याआधी घाईघाईने राज्यपाल नियुक्त 7 आमदारांनी मंगळवारी शपथविधी उरकला. हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार आहे. देवेंद्र फडणवीस घरघर संविधानचा नारा देतात. याबाबत हायकोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित असताना या संदर्भात घाईघाईने आचारसंहिता जाहीर व्हायच्या पाच तास आधी राज्यपालांनी शपथ दिली. याबाबत राज्यपालांनी घटना पाहिले आहे का? पहिली यादी राजभवनामध्ये पडून आहे आणि दुसरी यादी तुम्ही घाईघाईने पाठवता. ज्या कारणासाठी तुम्ही आमची यादी थांबवली. प्रत्येक जो सदस्य होता, त्याची चौकशी करण्यात आली. पण तुम्ही तुमची यादी तात्काळ पाठवून घाईने शपथ दिली. त्यांच्या संदर्भात राज्यपालांनी कोणती विशेष माहिती घेतली? हे सर्वजण राजकीय कार्यकर्ते आहेत, धर्मगुरू आहेत. या सातमधील इद्रिस नाईकवाडी हे एक सदस्य आहेत. त्यांच्या इतिहास काय आहे? त्यांनी वंदे मातरमला विरोध केला होता. सांगली महानगरपालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केला होता. त्या व्यक्तीस तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता? कुठे गेला तुमचा हिंदूंचा गब्बर? देवेंद्र फडणवीस हिंदूची भाषा करता? ज्यांनी हिंदूला विरोध केला त्यालाच तुम्ही आमदार कसा काय केला? असा सवाल राऊतांनी उपस्थित करत फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. इद्रिस नाईकवाडी यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावरती हल्ला केला होता. त्या नाईकवाडीचे पोलीस रेकॉर्ड तपासा. महाराष्ट्राला मला सांगायचं आहे की तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवरती आता पिपाडा वाजवायची अधिकार नाही, याला आधी विरोध करा, तर तुम्ही खरे हिंदूंची अवलाद, असं राऊत म्हणालेत.

सर्वोच्च न्यायालय दबावाखाली : आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात अजून लागलेला नाही आहे. एकीकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात. तरी पण निकाल लागत नाही, यावर संजय राऊत म्हणाले की, तो निकाल लवकर लागणारही नाही. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही अजून आम्हाला तारीख पे तारीख दिली जात आहे. पण सर्वोच्च न्यायालय आणि न्यायव्यवस्था ही कोणाच्या तरी दबावाखाली काम करतेय, असं दिसतंय. कारण संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाचे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने एका घटनाबाह्य सरकारला वाचवलंय. हा जनतेचा अपमान आहे आणि कुठल्या सर्वोच्च न्यायालयातील एका व्यक्तीच्या कुटुंबाने लंडनमध्ये 300 कोटींचा व्हिला खरेदी केलाय. त्याबाबत मी लवकरच माहिती घेऊन खुलासा करणार असल्याचं राऊत म्हणाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील एका व्यक्तीवर राऊतांनी गंभीर आरोप केलाय. हे घटनाबाह्य सरकार वाचवण्यासाठी हजार कोटी रुपये खर्च केलेत. घटनाबाह्य सरकारचा निकाल तातडीने देणे अपेक्षित होतं. पण ते सर्वोच्च न्यायालयाकडून झालं नाही. त्यामुळे लोकांचा आता सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास उडालाय. हे सरकार वाचवण्यासाठी एक मोठं षडयंत्र होतं. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचे रक्षण करणे गरजेचे असते. पण ते तसं झालं नाही आणि याबाबत लवकरच माहिती घेऊन बोलणार असल्याचं राऊत म्हणाले.

... तर आम्ही त्यांचे स्वागत करू: दरम्यान, राज ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवणार असून, आमचे राज्यात सरकार येईल, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, स्वबळावर राज ठाकरे लढवणार आहेत का? कारण महाराष्ट्रात 288 जागा आहेत आणि बहुमतासाठी 145 जागा लागतात. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट त्यांना दोनच जागा देतोय. पण शेवटी लोकशाही आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं. उद्या भाजपा आंतरराष्ट्रीय पक्ष असून, ते अमेरिकेत अदानींच्या माध्यमातून पोहोचतील. त्यामुळं जर राज ठाकरे यांची राज्यात सत्ता आली तर त्याचे आम्ही स्वागतच करू, असा टोला संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. जगाने ईव्हीएम मशीनला नाकारलंय. परंतु भारतातच ईव्हीएम मशीन आहे. मशीन यांना का लागते हे समजत नाही. आता ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोगाचे काय नातं आहे. हे अख्ख्या जनतेला माहिती आहे, असे बोलायला राऊत विसरले नाहीत.

हेही वाचा-

  1. 'झिरो टू हिरो'! 1962 साली शून्य जागा जिंकणारा भाजपा आता आहे 'किंगमेकर'
  2. विधानसभेचा सारीपाट निवडणूक आयोगानं मांडला, एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.