ETV Bharat / state

'तीच विटी आणि तोच दांडू...', संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल - Sanjay Raut On Amit Shah - SANJAY RAUT ON AMIT SHAH

sanjay raut : जम्मू काश्मीरमध्ये डोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात चार जवान हुतात्मा झाले होते. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

sanjay raut
sanjay raut (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 3:03 PM IST

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले होते. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी अमित शाह हे अपयशी गृहमंत्री असल्याचा टोला लगावला. जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनेक जवान हुतात्मा झालेत याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. नैतिकता शिल्लक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाह यांचा राजीनामा घ्यावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तीच विटी आणि तोच दांडू : संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली नेमका त्याच दिवशी काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला. इथेही तीच विटी आणि तोच दांडू. तेच गृहमंत्री जे पाच वर्ष अपयशी ठरले. तर दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. ज्यांच्याकडून पण काहीच ठोस कार्य झालं नाही. तेच अमित शाह, तेच राजनाथ सिंह, अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसलेले आहेत. अमित शाह देशाच्या निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणं, इतरांना धमक्या देणं याच्यात व्यग्र आहेत." असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पूर्णतः अपयशी गृहमंत्री : संजय राऊत पुढे म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राजकीय विरोधकांना त्यांचे शत्रू मानतात. अमित शहा यांनी विरोधकांना संपवण्यासाठी जी ताकद लावली तीच ताकद जम्मू काश्मीर आणि मणिपूरमध्ये लावली असती तर जवानांच्या हत्या पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. अमित शाह यांनी आपल्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून आतापर्यंत 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. परंतु या जवानांच्या हत्यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. ते पूर्णतः अपयशी गृहमंत्री ठरले आहेत."

हेही वाचा

  1. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीचा वाद मिटेना! अमोल कीर्तिकर यांनी उच्च न्यायालयातील याचिकेत काय म्हटले? - Maharashtra politics
  2. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा? : NCP पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी - NCP party and symbol Hearing
  3. राहुल गांधींना जलद न्याय मिळवण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी - Rahul Gandhi RSS defamation Case
  4. नाना पटोले होणार भावी मुख्यमंत्री? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा भाऊ - Nana Patole CM Post Race

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.