ETV Bharat / state

"निवडणूक आयोग भाजपाची शाखा असल्यासारखा...", संजय राऊतांचा हल्लाबोल - Lok Sabha election results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (3 जून) पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधत जोरदार टीका केली. तसंच निवडणूक आयोग भाजपाची एक शाखा असल्यासारखं काम करत असल्यामुळं देशातील लोकशाही गेल्या दहा वर्षांत संकटात आल्याचंही ते म्हणालेत.

Sanjay Raut criticized Election Commission and BJP said Election Commission is nobodys slave
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 2:16 PM IST

Updated : Jun 3, 2024, 2:31 PM IST

मुंबई Sanjay Raut News : देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच वेगवेगळ्या संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. त्यामध्ये एनडीए प्रणित भाजपा सत्तेत विराजमान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात दावे प्रतिदावे करत आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधलाय.

संजय राऊत पत्रकार परिषद (Source reporter)

काय म्हणाले संजय राऊत : यासंदर्भात आज (3 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाच्या संदर्भात लोकांमध्ये अनेक शंका आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्र संविधानिक संस्था आहे. परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजेच विरोधी पक्षातील सर्वांना जाऊन वारंवार हात जोडावे लागतात आणि काही गोष्टी त्यांच्यासमोर मांडाव्या लागतात. निवडणूक आयोग देखील ऐकून न ऐकल्यासारखं करतो. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या काळात ध्यानाला बसतात आणि पूर्ण लक्ष आपल्याकडं केंद्रीत करतात. हा एक प्रकारे आचारसंहितेचा भंग आहे. देशाचे गृहमंत्री देशातील विविध भागातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सूचना देतात, हे देखील आचारसंहितेचं उल्लंघन आहे. पोलिंग एजंटला थांबवलं जातं हे देखील कधी अगोदर घडलेलं नाही."

पुढं राऊत म्हणाले, मतमोजणीला प्रत्यक्षात जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस काय होईल हे आपल्याला माहीत नाही. लोकशाही असलेल्या देशातील स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाला सांगावं लागतंय की आपण स्वायत्त संस्था आहोत. पण आपण कोणाचेही गुलाम नाही, हे लक्षात घ्या. भाजपा असो की इतर दुसरी सत्ताधारी पार्टी असो आपण त्यांचे गुलाम नाहीत. आपण स्वायत्त संस्था आहात म्हणून निष्पक्ष काम करा. मात्र, निवडणूक आयोग तशाप्रकारे काम करत नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसंच निवडणूक आयोग भाजपाची एक शाखा असल्यासारखं काम करत असल्यामुळं देशातील लोकशाही गेल्या दहा वर्षात संकटात आली, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद, नेमकं कारण काय? - EC Press Conference
  2. मुंबईत लोकसभा मतमोजणीची तयारी पूर्ण, कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी - Lok Sabha Election Vote Counting
  3. मतमोजणीसाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट; मतमोजणी केंद्राचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा - Lok Sabha Elections 2024

Last Updated : Jun 3, 2024, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.