ETV Bharat / state

'शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे सुपाऱ्या घेणारे पक्ष'; खासदार संजय राऊतांनी सुनावलं - Sanjay Raut On Maharashtra Politics - SANJAY RAUT ON MAHARASHTRA POLITICS

Sanjay Raut On Maharashtra Politics : मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सुपाऱ्या घेणारे पक्ष असल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde
संजय राऊत, एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 8:03 PM IST

Updated : Jun 11, 2024, 8:20 PM IST

मुंबई Sanjay Raut On Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपानं राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेची मनधरणी केली. त्यानंतर मनसेनं या निवडणुकीत उतरणार नसल्याचं जाहीर केलं.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद (ETV Bharat Maharashtra Reporter)

राज ठाकरेंचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत त्यांना आपला उमेदवार मागं घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळं मनसेत अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

शिवसेना, राष्ट्रवादी सुपाऱ्या घेणारे पक्ष : 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे भाजपाकडून सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. हे तीन पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीतून तयार झालेले आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कमजोर करण्याचं काम या पक्षांना देण्यात आलं आहे. 'सांगितलेलं काम करा, अन्यथा तुरुंगात जा, असं भाजपानं या तिघांना सांगितलंय', त्यामुळं यांचं धाब दणाणल्याचं राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय : येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी विजयी होणार, असा दावा संजय राऊतांनी केलाय. "महाराष्ट्रात जोपर्यंत आम्ही सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत आमचा आत्मा भटकत राहणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही तिघं मिळून विधानसभा निवडणूक लढवू. त्यानंतर राज्यात सरकार स्थापन करू. आता एनडीएचं सरकार आहे. जोपर्यंत चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार हे दोघेही सत्तेत राहतील तोपर्यंत मोदींची उधारी शक्ती आहे. नायडू, नितीश कुमार यांना कोणतं मोठं मंत्रिपद मिळाले?. चिराग पासवान, जीतन राम मांझी यांना कोणतं मोठं मंत्रालय मिळाले? चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाकडं 18 तर नितीश यांच्याकडं 12 खासदार आहेत. त्यांना काहीच मिळालं, नाही तर अजित पवारांना काय मिळणार, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

हे वाचलंत का :

  1. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार? नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी - Maharashtra Cabinet Expansion
  2. मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारला इशारा?, मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या अर्थ काय? - Mohan Bhagwat On Manipur violence
  3. लोकसभा निवडणुकीनंतर 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण, 10 कोटींच्या निधीची तरतूद - Waqf Board Fund

Last Updated : Jun 11, 2024, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.