ETV Bharat / state

लोकसभा निकालानंतर भाजपावर आकडे लावण्याची वेळ येईल, इंडिया आघाडी 300 पेक्षा जास्त जागा जिकंणार - संजय राऊत - LOK SABHA ELECTION 2024

Sanjay Raut : 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केलाय. त्यांचा आकडा काहीही असला तरी, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावण्याचं काम करावं लागेल', अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते आज नागपुरात बोलत होते.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 5:26 PM IST

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

नागपूर Sanjay Raut : पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कोणी कितीही सर्वे केले, तरी परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होईल, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते. जनता पक्ष पाहात नसून, महाविकास आघाडीचे उमेदवार बघत आहे. रामटेक मतदारसंघात आमच्या गटाचा उमेदवार नाही, मात्र मी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच भाजपानं मुंबईत किमान एक तरी जागा जिंकून दाखवावी, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

फडणवीसांना आकडं लावण्याचा धंदा : 'लोकसभा निवडणुकीला हळूहळू रंग चढत आहे. निवडणुकींच्या जागांबाबत सर्वेक्षणं येत असून त्या सर्वेक्षणाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रात आम्हाला शंभर टक्के यश मिळणार. राज्यात 45 हून अधिक उमेदवार निवडून येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस सांगतात. त्याची संख्या काहीही असो, त्यांना आकडेमोड करण्याची सवय आहे. निवडणुकीनंतर त्यांना आकडेच लावावे लागतील', असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी तसंच देशात इंडिया आघाडी यशस्वी होणार आहे. महाराष्ट्रात 35 तर देशात 305 जागा आम्हाला मिळतील, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांना काहीच मिळणार नाही : रामटेक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला. ते विद्यमान खासदाराला तिकीट देऊ शकले नाहीत. त्यामुळं त्यांना रोड शो करू द्या. मात्र, त्यांच्या हातात काहीचं पडणार नाही, असा निशाना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर साधला आहे.

पळपुट्यांच्या मागे राम कधी उभा राहत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रभू श्रीराम यांच्याबद्दलचं प्रेम खोटं आहे. कोणत्याही लढ्यात, संघर्षात एकनाथ शिंदे नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे कधी उभा राहात नाही, तर आत्मविश्वासानं लढणाऱ्यासोबत राम असतात, असं राऊत म्हणाले.

अजित पवार स्वतः व्यापारी : अजित पवार यांच्यावर निशाना साधताना राऊत म्हणाले, अजित पवार स्वतः व्यापारी आहेत. त्यामुळं ते सौदा करतील. देश देखील व्यापारीचं चालवत आहे. त्यांचे एजंट अजित पवार आहेत.

नवनीत राणा खरं बोलल्या : अमरावती येथील एका प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा यांनी देशात नरेंद्र मोदी यांची हवा नाही असं वक्तव्य केलं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'अमरावतीच्या खासदार ताई अगदी बरोबर बोलल्या. देशात मोदींची लाट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक उत्सवाच्या बाहेर येऊन बोललं पाहिजे, गल्ली बोळातील लोकसुद्धा असं बोलत नाहीत. नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील याची गॅरंटी उरली नसून ते कसली गॅरंटी देत आहेत'.

विशाल पाटलांची हकालपट्टी करा : काँग्रेस पक्षात कुणी बंडखोरी करून निवडणूक लढवत असेल, तर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षाच्या नेत्यानं शिस्तभंग केल्यास पक्षानं त्याची हकालपट्टी करावी, असं माझं मत आहे. सांगलीत कुणाची ताकद किती आहे हे लोकांना ठरवू द्या, सांगलीत आमचाचं विजय होईल, असा दावा देखील राऊत यांनी केलाय.

हे वाचलंत का :

  1. 'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा'; कट्टर राजकीय विरोधक अडसूळ-राणा एकत्र, अनेक वर्षांचं शत्रुत्व संपलं - Lok Sabha Election 2024
  2. मोठी बातमी! भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना धमकी; दाऊद, छोटा शकीलकडून ठार मारण्याची धमकी - Eknath Khadse
  3. लोकसभा निवडणूक 2024; प्रचारात विजय वडेट्टीवारांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.