मुंबई - "शिवरायांच्या पुतळ्याचे बजेट १५ ते १६ कोटींचे असताना त्यावर फक्त १५ ते १६ लाख खर्च झाले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले,"मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, मी स्वतः बांधावर आणि शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करणार आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत असा हा दौरा असणार आहे. या सरकारला शेतकरी आपला लाडका आहे, असं कधीच वाटलं नाही. तर राज्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी हा राजकीय कारणांसाठी फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे."
मग गृह खाते काय करत आहे? खासदार राऊत पुढे म्हणाले, " शिवाजी महाराजांच्या पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे महाराष्ट्रातून पळून गेला असेल तर त्याला सरकारनं मदत केली आहे. गुन्हेगारांना लपण्यासाठी वर्षा ही सुरक्षित जागा आहे. मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी १५ ते १६ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात खर्च १५ ते १६ लाख झाला असल्याचं तज्ञांचे मत आहे. मग बाकीचे पैसे कुठे गेले?"
जयदीप आपटेच्या विरोधात लुकाऊट नोटीस जारी केली. याचाच अर्थ तो पोलिसांच्या हाती लागत नाही. मग गृह खाते काय करत आहे? मंत्रालयाचा सहावा मजला आणि वर्षा बंगल्यावर गुंड दिसल्याचं यापूर्वीसुद्धा अनेक फोटो मी समोर आणले आहेत. मग जयदीप आपटे अशा सुरक्षित जागी लपला असेल. जर तसं नसेल तर त्याला त्वरित अटक करा-खासदार, संजय राऊत
ममता बॅनर्जी यांनी राज्यात कायदाही केला संजय राऊत पुढे म्हणाले, " कोलकत्ता येथे एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर भाजपाच्या गुंडांनी पंधरा दिवस राज्यातील कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातात घेतली होती. भाजपाचे ते आंदोलन पूर्णपणे राजकीय होतं. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्या आरोपीला अटक केली. त्याच्यावर कारवाई झाली. महिला अत्याचार रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी राज्यात कायदाही केला आहे. परंतु महाराष्ट्रात बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. बदलापूरच्या शाळेचे अध्यक्ष, संचालक हे आपटे आणि कोतवाल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनसुद्धा त्यांना अटक झालेली नाही. तसेच शाळेमधील सीसीटीव्ही फुटेज कोणी गायब केले? आपला शिपाई वाचवण्यासाठी की आणखी कोणत्या कारणामुळे? आरोपींना वाचवण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे का? असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-
- भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून शिवरायांच्या पुतळ्याची मुंबईत विटंबना-संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut today news
- "माझ्यावर बलात्कार...", स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांविरोधात ईडीला लिहिलं पत्र - Patra Chawl Scam Case
- "फडणवीस यांना इतिहास समजलेला नाही, ते औरंगजेब फॅन क्लबचे..."- संजय राऊतांची खोचक टीका - Surat loot remark