ETV Bharat / state

भाजपानं महाविजय कसा मिळवला? कोडं उलगडलं, जाणून घ्या भाजपाचा बूथ मॅनेजमेंट फॉर्म्युला - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

यंदा भाजपानं निर्विवाद यश मिळवून 132 जागांवर विजय मिळवलाय. भाजपानं लोकसभेतील पराभव विधानसभेत कसा मोडून काढला, याबाबत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी माहिती दिलीय.

Sanjay Bhende says bjp booth management by abcd category and bjp micro planning is successful for Maharashtra Assembly Election 2024
भाजपानं विधानसभा निवडणुकीत विजय कसा मिळवला (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 12:28 PM IST

नागपूर : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवून 132 जागांवर विजय मिळवला. लोकसभेला आलेलं अपयश आणि विधानसभेतील भरारी यामध्ये अनेक मायक्रो प्लॅनिंगचा जय झालाय. बूथ टू बूथ मार्केटिंग करत भाजपानं लोकसभेतील पराभव विधानसभेत कसा मोडून काढला, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. तसंच भाजपानं 132 जागांपैकी तब्बल 75 जागा या केवळ बूथ मॅनेजमेंटच्या जोरावर जिंकल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय.

भाजपाच्या बूथचे वर्गीकरण कसे असते समजून घ्या :

A कॅटेगरी म्हणजे लोकसभा निवडणुकीत जिथं महायुतीला 50% पेक्षा जास्त मतदान मिळाले.
B कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 35 ते 50% मतदान मिळाले.
C कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 20 ते 35% मतदान मिळाले.
D कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 20% पेक्षा कमी मतदान मिळाले.

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

सी आणि बी कॅटेगरीच्या बूथवर लक्ष केंद्रित : लोकसभेच्या निकालानंतर भाजपानं सी आणि बी कॅटेगिरीच्या बूथवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं. त्यानुसार भाजपानं मायक्रो प्लॅनिंग केलं. भाजपाने सर्वात अगोदर नवीन मतदार नोंदणी करून लोकसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांना भाजपा किंवा महायुतीसाठी मतदान करण्यास प्रोत्साहित केलं. तसंच सी कॅटेगरीचे दहा टक्के बूथ बी कॅटेगरीमध्ये नेले. तर बी कॅटेगरीचे सुमारे 20% बूथ ए कॅटेगरीत परावर्तित केले.

मायक्रो प्लॅनिंगचा फायदा : प्रत्येक बूथ वरील कार्यकर्त्यांना त्यांच्या बूथच्या यादीची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. यादी वाचन करून कोणता मतदार कुठे राहतो, तो भाजपाला मतदान करू शकतो की नाही, त्याला भेटून-बोलून त्याचं मत भाजपाच्या दिशेने वळवण्यासाठी प्रत्येक बूथवर आढावा घेण्यात आला.

जनसंपर्क वाढवला : भाजपानं विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसंदर्भात आपली योजना बदलली. लाभार्थ्यांची मोठमोठी संमेलनं घेण्याऐवजी त्यांच्या परिसरात जाऊन 100 लाभार्थ्यांना एकत्रित करून छोट्या बैठका घेण्यात आल्या. त्यामुळं लोकसभेत भाजपाला मतदान न करणारे अनेक लाभार्थी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बाजूनं आल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा -

  1. महायुतीच्या ऐतिहासिक विजयामागं 'आरएसएस'; गेल्या 5 महिन्यात काय घडलं? जाणून घ्या 'अंदर की बात'
  2. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्यानं नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
  3. जाणून घ्या, का आहेत देवेंद्र फडणवीस 'विक्रमादित्य'?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.