ETV Bharat / state

धाराशिव मतदान केंद्राजवळ एकाची हत्या, तीन जण गंभीर जखमी - Dharashiv Murder

Dharashiv Murder : मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची गंभीर घटना घडली आहे. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव असून चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीमध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dharashiv Murder
Dharashiv Murder (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 7:10 PM IST

अतुल कुलकर्णी यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat Maharashtra)

धाराशिव Dharashiv Murder : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हत्येची घटना घडली आहे. या घटनेमुळं मतदानाला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. हि घटना वैयक्तीक वादातून घडल्याचं पोलिसांचं मत आहे. तर, ही हत्या राजकीय वादातून हत्या झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.

हल्ल्यात तिघे गंभीर जखमी : हा हल्ला राजकीय वादातून झाल्याचं बोललं जात असून या ठिकाणचं वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन गटांतील वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यात झाल्यानं एकाला जीव गमवावा लागलाय. या हल्ल्यात इतर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन गटात भांडण : भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात ही घटना घडली आहे. मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातून दोन गटात भांडण झालं यातून एका गटानं दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. समाधान पाटील या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर, चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे. चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली असून हा झालेला प्रकार वैयक्तिक कारणामुळं झाल्याचं प्राथमिक माहितीवरून सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. पालघर लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलणार, खासदार राजेंद्र गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता - Rajendra Gavit join BJP
  2. शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Dattatray Bharane Viral Video
  3. निवडणुकीच्या दिवशी आई कशी...; रोहित पवारांनी साधला अजित पवारांवर निशाणा - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.