ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी हॅरीनं उतरवली 'पगडी' लढवली 'ही' शक्कल - Salman Khan Firing Case

Salman Khan Firing Case : सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी हरपाल सिंग याला हरियाणातून अटक केली. मात्र मुंबई पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी हरपाल सिंग यानं पगडी उतरवून केस कापल्याचं उघड झालं आहे.

Salman Khan Firing Case
आरोपी हरपाल सिंग (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 11:09 AM IST

मुंबई Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला हरियाणा इथून अटक केली. अटक आरोपी हरपाल सिंग उर्फ हॅरी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम आपल्या शोधात आल्याचं समजताच हरपाल सिंग यानं पगडी काढून केस कापले. जेणेकरुन आपली ओळख लपवून मुंबई पोलिसांना चकमा देता येईल. मात्र, तरी देखील मुंबई पोलिसांच्या टीमनं 9 दिवस अथक परिश्रम घेत हरपाल सिंगच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Salman Khan Firing Case
आरोपी हरपाल सिंग (Reporter)

पगडी काढून कापले केस : मुंबई पोलिसांपासून वाचवण्यासाठी हरपाल सिंग यानं पगडी काढून केस कापले. मात्र तरी पोलिसांनी त्याला 9 दिवस पाळत ठेऊन बेड्या ठोकल्या. हरपाल सिंग उर्फ हॅरी याच्या विरोधात भटिंडा इथं 2022 मध्ये कलम 399 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यानं 2023 मध्ये रायपूर इथं एका व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबार केला. 2018 पासून पाचवा आरोपी मोहम्मद रफिक सरदार चौधरी आणि हरपाल सिंग उर्फ हॅरी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले. राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यातील काही भाग बिष्णोई गँगनं प्रभावित असून इथं अनेक तरुणांचे लॉरेन्स बिष्णोईच्या फॅन्सचे वॉट्सअ‍ॅप ग्रुप देखील सक्रिय आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून देखील अनेक जण लॉरेन्स बिष्णोई गँगशी जोडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

चौधरीची हरपाल सिंगला धमकी : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला 30 ऑगस्ट 2023 मध्ये तिहार कारागृहातून साबरमती कारागृहात आणण्यात आलं. दरम्यान, बंदिवानांना नातेवाईकांना भेटण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेत बिष्णोई गँगचे साथिदार लॉरेन्सला भेटत असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मोहम्मद रफिक चौधरी याला लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये हरपाल सिंगनं भरती केलं असून हरपाल सिंग हा हिंदू पंजाबी आहे. तो पंजाबी लोकांसारखी पगडी परिधान करतो. मात्र, मुंबई पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच त्यानं पगडी काढून केस देखील बारीक केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्याचप्रमाणे सलमान खानवर गोळीबार करण्याचा कट रचला तेव्हा चौधरीनं मुंबई पोलिसांनी जर मला पकडलं, तर मी तुम्हा सर्वांची नावं पोलिसांसमोर उघड करणार असल्याची धमकी हरपाल सिंगला दिल्याचं तपासात उघड झालं.

हेही वाचा :

  1. सलमान खान गोळीबार प्रकरणात रोहित गोदाराला बनवले सहआरोपी - Salman Khan House Firing Case
  2. सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला केली अटक - salman khan
  3. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपी रफिक चौधरीने आणखी दोन स्टारच्या घरांची केली होती पाहणी - Salman Khan house firing case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.