ETV Bharat / state

रोहित पवारांची भाजपावर तर आव्हाडांची तटकरेंच नाव न घेता टीका - Rohit Pawar Criticism BJP - ROHIT PAWAR CRITICISM BJP

Rohit Pawar Criticism BJP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र म्हणून संबोधले जाणाऱ्या ऑर्गनायझर मधून भाजपाने अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी केल्याची टीका केलीय. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपासह अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar Criticism BJP
रोहित पवार (etv reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 11:03 PM IST

मुंबई Rohit Pawar Criticism BJP : भाजपाने अजित पवार यांना बरोबर घेऊन आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केल्याच ऑर्गनायझर मधून वाचण्यात आलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपाला अपयश मिळाले असते तर टीका योग्य असती; मात्र देशातच लोकांनी भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आहे. हे वास्तव असून आम्ही हे गेले त्या दिवसापासून सांगत होतो, ते खरं होत असल्याचं दिसत आहे. वापरून फेकून द्यायचं भाजपाची जुनी सवय असून लोकांना आता माहिती झाल्याचं निवडणुकीत दिसून आल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संघ भाजपाला का सूचना देते - नाना पटोले : ऑर्गनायझर मधील लेखाबद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संघ भाजपाला सूचना देत की नाही माहिती नाही. संघाची आवश्यकता नसल्याचं भाजपानं बोलून दाखवलं आहे. तरी देखील संघ भाजपाला का सूचना देते हा जनतेला पडलेला प्रश्न असल्याचं पटोले म्हणाले आहे.

Rohit Pawar Criticism BJP
रोहित पवार यांचे ट्विट (सोशल मीडिया)
अजित पवार यांच्या बंडखोरी मागील खरे कट कारस्थानी तटकरेच - जितेंद्र आव्हाड : सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले नाव न घेता अजित पवार यांच्या आडून हल्लाबोल करणं ही त्यांची जुनी सवय असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. चला भाजपात जाऊ या अशा प्रकारची गळ वारंवार तुम्ही शरद पवार यांना घातली. चार वेळा फॉर्मुला तुम्ही त्यांना दिला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. याला शरद पवार तयार नव्हते. त्यावेळी देखील तुम्ही तिघे भाजपा सोबत जाऊ यावर ठाम होता. अजित पवार यांच्या बंडखोरी मागील खरे कटकारस्थान करणारे तटकरेच असल्याच जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरे यांचं नाव नाही घेता खळबळजनक दावा केला आहे. तसेच तुमच्यावर आरएसएसने खापर फोडलं हे मला मान्य नाही; पण तुम्ही डिफेन्स पण करू शकत नाही. तुमच्या नेत्या विरोधात बोलल्यावर तुम्ही आरएसएस विरोधात बोलू शकत नाही. हिम्मत असेल तर उत्तर द्या असं आव्हाड यांनी अजित पवार गटाला आव्हान दिलं आहे. मोदी सरकार मंत्रिमंडळात तुम्ही इच्छुक नाही.

तुमच्या पक्षात काय ते बघा : राज्यसभा जागेवरून दिल्लीत काय गोंधळ झाला लोकांना माहीत नाही. छगन भुजबळ यांना सांगतात तुम्हाला मुंबई सांभाळायची. त्यांना राज्यसभा मिळणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर सर्दीपडसे कारण चालणार नाही. तुमच्या पक्षात काय ते बघा, पक्षात गट पाडले शांत बसलोय तर बसू द्या, असं आवाहन आव्हाड यांनी सुनील तटकरे यांना केलं आहे.

हेही वाचा:

  1. भाजपासाठी शिवसेनेनं केला मोठा त्याग, 'या' मतदारसंघातून घेतला उमेदवारी अर्ज मागं - Graduate Constituency Election
  2. अखेर जितेंद्र आव्हाड खरं बोलले, सुनिल तटकरेंचा टोला, अजित पवार लवकरच करणार राज्याचा दौरा - Sunil Tatkare On Jitendra Awhad
  3. मेळघाटातील शेतकऱ्याला आधुनिक शेतीचा ध्यास; अडीच एकर पैकी अर्धा एकरमध्ये खोदले शेततळे - Shettale In Melghat

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.