ETV Bharat / state

बारामती मतदारसंघातून शरद पवार निवडणुकीच्या मैदानात - Lok Sabha Elections 2024 - LOK SABHA ELECTIONS 2024

LOK SABHA ELECTIONS 2024 : शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानं चांगलीच चर्चा रंगलीय. सुप्रीया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असताना त्यात शरद पवारांच्या नावाची भर पडलीय

LOK SABHA ELECTIONS 2024
LOK SABHA ELECTIONS 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 11:01 PM IST

पुणे LOK SABHA ELECTIONS 2024 : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, शरद पवारांना देखील बारामती मतदारसंघातून भारतीय गीग कामगार मंच तसंच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामतीतून शरद पवारांना उमेदवारी : गीग कामगार मंच तसंच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात बारामतीमधून रिक्षाचालक शरद पवार यांना, तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ, मावळमधून कॅब चालक संतोष वालगुडे, शिरूरमधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ 18 तसंच 24 एप्रिल रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसंच बारामतीमधून शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

याबाबत डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले, व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षानं गांभीर्यानं विचार केलेला नाहीय. त्यामुळं आम्ही मतदानाद्वारे आमचं आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहोत. या चार लोकसभा मतदार संघात 4 लाख गिग कामगार तसंच त्याचं १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळं आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून दाखवून देणार आहोत. पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये शरद पवार राहत असून गेली 5 ते 6 वर्षापासून ते रिक्षा चालवतात. शरद पवार बारामती मतदासंघातून मैदानात उतरले असून त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे वाचा -

  1. महाराष्ट्रातून दोन छत्रपतींचे वंशज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात; राजघराण्यांना राजकीय पक्ष का करतात जवळ? - Lok Sabha Election 2024
  2. ठाकरेंसमोर काँग्रेस चितपट; दोन कळीच्या जागांवर मारली बाजी - Lok Sabha Election 2024
  3. रौप्य महोत्सवात साताऱ्यातून राष्ट्रवादीचं घड्याळ हद्दपार, खासदार राष्ट्रवादीचा असताना जागा गेली भाजपाकडं - NCP Silver Jubilee

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.