ETV Bharat / state

रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये, थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस - Ravindra Waikar - RAVINDRA WAIKAR

Ravindra Waikar : मुंबई पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यात चुरशीची लढाई झाली. यामध्ये केवळ 48 मतांनी शिवसेना उमेदवार रवींद्र वायकरांना विजयी करण्यात आलं होतं. आता त्यांना खासदार म्हणून शपथ दिली जाऊ नये अशी मागणी हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीसांच्याकडे केली आहे.

Ravindra Waikar
संसद भवन आणि रवींद्र वायकर (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 11:05 AM IST

मुंबई - Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये, अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून दिली आहे.

लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांना इमेलद्वारे सुद्धा हे नोटीसपत्र पाठवल्याचं ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले. या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणी बाबत FIR दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणं म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणं ठरेल.

नोटीसपत्रात हे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की, अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरु असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो, तो फोन ईव्हीएम मशीनबरोबर जोडलेला होता, असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि याबाबतची चौकशी सुरू आहे. ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा, त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजपला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची अशी चर्चा अनेकदा होत असतांना, यावेळी प्रथमच अश्याच संदर्भात एफआयआर दाखल झालेला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांचं निवडून येणं प्रथमदर्शनीच शंकास्पद आहे. त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशी मागणी आजपर्यंत कुणी केली नसेल अशी मागणी थेट लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांच्याकडे हिंदू समाज पार्टीच्या भरत खिमजी शाह यांनी केली आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचं मुद्दाम टाळण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती हेच दाखवणारी आहे की, सरकारी यंत्रणा सत्य लपवण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहे, असेही भरत खिमजी शाह यांनी नमूद केले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी, भरत खिमजी शाह यांनी ऊच्च न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल करणार असल्याचे सुद्धा जाहीर केलं आहे.

हेही वाचा -

एका मताचा फरक ते 48 मतांनी विजय : विजयी खासदाराला पराभूत करण्याचा अधिकार आहे का? - Ravindra Waikar Wins Controversy

सत्तेचा गैरवापर करून झालेल्या पराभवाचे विजयात रुपांतर करू, आम्ही कोर्टात जाणार - आदित्य ठाकरे - Aditya Thackeray Mumbai PC

ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला, पोलिसांच्या भूवया उंचावल्या - Ravindra Waikar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.