मुंबई Small Animal Hospital : उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचं स्वप्न होतं. ते आता पूर्ण झालंय. 'टाटा ट्रस्ट्स स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल' असं या रुग्णालयाचं नाव आहे. 'स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल'ने आपल्या चाचणी टप्प्याचा भाग म्हणून देऊ केलेल्या मुख्य सेवांना आणि डेमो ऑपरेशन्सना मिळालेल्या यशानंतर, येथील अपॉइंटमेंट्स खुल्या करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन मदत आणि अपॉइंटमेंट्स अशी घ्या : ॲनिमल हॉस्पिटल हे फोनलाइनद्वारे केलेल्या निश्चित वेळेसाठीच्या अपॉइंटमेंट्स स्वीकारेल. अपॉइंटमेंट आणि आपत्कालीन मदत फक्त (+9102231053105) या क्रमांकावर फोन करून किंवा हॉस्पिटलच्या वेबसाइटच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेक्स्ट पाठवून मिळवता येईल. यामुळं येथील टीमला प्रत्येक पाळीव प्राण्याला योग्य वेळ आणि लक्ष देणं शक्य होणार आहे.
हॉस्पिटलमध्ये विविध सेवांचा समावेश : हॉस्पिटलकडून प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजानुसार सेवा पुरविण्यासाठी नेमलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ आणि पाळीव प्राण्याच्या देखभालीतील मदतनीसाच्या तज्ज्ञ टीमद्वारे सेवेचा पुढचा टप्पा सुरू केला जाईल. भारतामध्ये प्राणी देखभालीचा एक नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या हॉस्पिटलमधील सेवामध्ये इमर्जन्सी रूम, प्राथमिक तपासणी आणि कन्सल्टेशन, इन-पेशंट देखभाल, डर्मेटोलॉजी, कार्डिओलॉजी आणि रेडिओलॉजी यांसह एमआरआय, सीटी, अल्ट्रासोनोग्राफी आणि इतर लॅबोरेटरीचा समावेश असेल. या हॉस्पिटलमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होणार असलेल्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया केल्या जातील.
“यशस्वी चाचणी टप्प्यानंतर अखेर आम्ही मुंबईतील पेट पेरेन्ट्ससाठी आपली दारे खुली करत आहोत. त्यांच्या छोट्या साथीदारांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यास उत्सुक आहोत. प्रत्येक पाळीव प्राण्याला सर्वोत्तम दर्जाची देखभाल मिळाली पाहिजे असं. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आमच्या सर्वसमावेशक आणि अभिनव सेवा सुविधांच्या संचाद्वारे त्यांना उच्चतम दर्जाची देखभाल पुरविण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्याकडे उपलब्ध वेळांचे स्लॉट्स मर्यादित असल्यानं लोकांनी निर्धारित फोन लाइनवर किंवा आमच्या वेबसाइटवर व्हॉट्सॲप टेक्स्ट पाठवून आपली अपॉइंटमेंट बुक करावी. जेणेकरून त्यांच्या पेट्सना स्वतंत्रपणे देखभाल आणि उपचार खात्रीने मिळू शकतील.” - डॉ. थॉमस हीथकोट ,चीफ व्हेटेरीनरी ऑफिसर 'स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल'
यांची नोंद घ्या : हॉस्पिटलमधील दैनंदिन अपॉइंटमेंट स्लॉट्सची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येक पाळीव प्राण्याकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरविले जावे आणि त्यांची काळजी घेतली जावी. आधी वेळ निश्चित न करता थेट हॉस्पिटलमध्ये आल्यास प्रतीक्षा कालावधीमध्ये वाढ होईल. त्यामुळं डिजिटल मंचावरील अपॉइंटमेंट यंत्रणा पुढच्या आठवड्यामध्ये कार्यरत होईपर्यंत आधीच फोन करून भेटीची वेळ निश्चित करावी.
हेही वाचा -