अहमदनगर Ahmednagar Manmad Highway Agitation : "रास्ता रोको" हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! म्हणून बारा दिवसात नगर-मनमाड महामार्ग रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा. अन्यथा जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा : आज गुरुवारी दुपारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीनं कोपरगाव ते नगर रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता-रोको आंदोलन छेडण्यात आलं. सुमारे तासभर झालेल्या आंदोलनाने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी दिग्विजय पाटनकर आणि ठेकेदार प्रतिनिधी गणेश चौधरी यांच्याकडे दिले. बारा दिवसात राहुरी खुर्द ते राहुरी पर्यंत रस्ता तात्काळ दुरुस्त करू अशी ग्वाही यावेळी अधिकारी यांनी दिली आहे.
आंदोलनात या कार्यकर्त्यांचा समावेश : आंदोलनात अशोक थोरे, संजय छल्लारे, अशोक सातपुते, सचिन बडोदे, महेश श्रीरसागर, हरिभाऊ साळगट, हरिभाऊ शेळके, बाबासाहेब मुसमाडे, अजिज मोमीन, हरिभाऊ शेळके, शेखर दुबय्या, भागवत मुंगसे, लखन भगत, अशोक थोरे, संजय दंडवते, अशोक सातपुते, भागवत मुंगसे, हरिभाऊ शेळके, गोकुळ लोंढे, विजय बडाख, रमन खुळे, एकनाथ खुळे, धनंजय आढाव, रोहिदास आढाव, विजय आढाव, विजय सिरसाट, पोपट सिरसाट, कैलास कोहकडे, संतोष येवले, बाबासाहेब मुसमाडे, ओंकार खेवरे, रोहन भुजाडी आदिंसह शिवसैनिक सहभागी झाले होते.
हेही वाचा: