ETV Bharat / state

रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रभू राम कुणाला पावणार? मतदार संघाकरिता भाजपा-शिंदे गटात जोरदार रस्सीखेच - Ramtek Lok Sabha Constituency - RAMTEK LOK SABHA CONSTITUENCY

Ramtek Lok Sabha Constituency : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभा करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच चालू आहे. हा मतदार संघ अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने येथून कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षानंही दंड थोपटले आहेत. जाणून घेऊन या मतदार संघाचे महत्त्व

Ramtek Lok Sabha Constituency
रामटेक लोकसभा मतदारसंघ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 10:30 PM IST

Updated : Apr 18, 2024, 12:46 PM IST

नागपूर Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक लोकसभा मतदारसंघाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदार संघ गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने मोठ्या फरकानं येथून निवडून आले. मात्र, आता राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे रामटेकमध्ये महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल? काय आहेत या मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे? कोण आहेत येथील इच्छुक उमेदवार? हे या रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत.

  • 'या' मतदारसंघांचा समावेश: रामटेक मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. तर या मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समावेश होतो. त्यात रामटेक, सावनेर, हिंगणा, काटोल, उमरेड आणि कामठी मतदारसंघ आहेत.

    रामटेक लोकसभा
    रामटेक लोकसभा

रामटेक शहराची ऐतिहासिक ओळख: प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं रामटेक शहर पावन झालेलं आहे. रामटेकला ‘रामाची टेकडी’ या नावानंसुद्धा ओळखलं जातं. प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासकाळात रामटेकच्या टेकडीवर काही काळ वास्तव्यास होते, अशी आख्यायिका आहे. रामटेकचं गडमंदिर सुमारे ६०० वर्षे जुनं आहे. हे शहर नागपूर शहरापासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. रामटेक टेकडीवर १४व्या शतकातील बरीच मंदिरे आहे. भक्तगण प्रथम धूम्रेश्वर महादेवाचं दर्शन घेऊनच श्रीराम मंदिरात दर्शनास जातात. १८६७ साली रामटेक नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती.

दहा वर्षांपासून शिवसेनेची सत्ता : रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख जरी रामाच्या नावानं होतं असली तरी या रामटेक मतदारसंघाला अनेक दिग्गज नेत्यांची कर्मभूमी म्हणूनदेखील ओळख आहे. कधी काळी हा मतदारसंघ काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ होता. मात्र, कालांतरानं काँग्रेसचा दबदबा कमी झाला. इथं शिवसेनेनं पकड मजबूत केली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. याशिवाय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते मुकुल वासनिक हे रामटेकचे खासदार राहिले आहेत. सोबतच सुबोध मोहिते हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. शिवसेनेचे प्रकाश जाधव हेदेखील खासदार राहिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या शिंदे गटाचे कृपाल तुमाने खासदार आहेत. त्यांना यावेळी पुन्हा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असली तरी भाजपा ही रामटेकसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. भाजपाकडून माजी आमदार सुधीर पारवे इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं गेल्या निवडणुकीत ३६ हजार तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने ४४ हजार मतं मिळवली होती, हेदेखील महत्त्वाचं आहे.

रामटेक लोकसभा
रामटेक लोकसभा

रामटेकचा राम कुणाला पावणार?: गेल्या १० वर्षांपासून रामटेक लोकसभेचा गड शिवसेनेच्या ताब्यात आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे रामटेकची धुरा आहे. मात्र, या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासाठी फारसं काहीही नाही. दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे उल्लेखनीय काम नजरेस पडत नाही. परंतु, खासदारकी काळात रामटेकमध्ये अनेक विकासकामे पूर्ण केल्याचा तुमाने यांचा दावा आहे. यामध्ये एम्स, मिहान, एमआयडीसी, आयआयआयटी यासह अनेक प्रोजेक्टसाठी पाठपुरावा केल्याचा ते दावा करतात. या उलट भाजपानं उद्धव ठाकरे गटाशी काडीमोड घेतल्यानंतरचं या मतदारसंघात आपली पकड मजबूत केली आहे. भाजपाचे माजी आमदार सुधीर पारवे आणि कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये मतदारसंघ पिंजून काढत असल्यानं दोघांचाही दावा नाकारता येत नाही.

काँग्रेसची भिस्त सुनील केदारांवर: नागपूर शहरात काँग्रेस पक्षामध्ये गटबाजी दिसून येते. त्याच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेस काहीशी एकसंघ दिसून येते. माजी मंत्री सुनील केदारांनी सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांची मूठ बांधून ठेवली आहे. त्यामुळे त्यांची पकड मजबूत समजली जाते. भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील लक्ष घालत असल्यानं "रामटेकचा गड" कोण सर करेल? हे आताच सांगणं कठीण आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास: रामटेक लोकसभा मतदारसंघ सन १९५७ मध्ये अस्तित्वात आला. काँग्रेसचे कृष्णराव देशमुख पहिल्यांदा निवडून आले होते. १९८४ व १९८९ मध्ये माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंह राव हे या मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले आहेत. १९९८ पर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यानंतर १९९९ मध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते पहिल्यांदा निवडून आले. २००९ मध्ये हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव करण्यात आला. त्यावेळी मुकुल वासनिक निवडणूक जिंकले होते. २०१४ पासून शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख २२ हजार ७६४ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ९४ हजार ७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

रामटेकचे मतदार आणि मतदान : २०१४ साली रामटेक लोकसभा निवडणुकीत ६२.६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १९ लाख २१ हजार ७४ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ६२.१२ आहे. २०१९ निवडणुकीत शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना ५ लाख ९७ हजार १२६ मतं तर काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना ४ लाख ७० हजार ३४३ मतं प्राप्त झाली होती. किशोर गजभिये यांचा १ लाख २६ हजार मतांनी पराभव झाला होता.

जातीनिहाय समीकरण: रामटेक लोकसभा मतदारसंघात जातीनिहाय परिस्थिती बघितल्यास एक लक्षात येतं की, तेली समाजाचं मत निर्णायक आहे. मात्र, कुणबीसह ओबीसी मतांची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्यात तेली, माळी, कुणबी मराठांची संख्या मोठी आहे. याशिवाय मुस्लिम समाजातील मतांची संख्या मोठी आहेत. कामठी विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.

रामटेक मतदारसंघातील समस्या: रामटेक शहर नागपूरपासून साधारण ५५ किलोमीटर अंतरावर आहे. या भागातील तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं थेट नागपूर गाठावं लागतं. वनसंपदेने नटलेल्या रामटेक परिसरात पर्यटनाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनाला चालना देऊन तसा विकास व्हावा आणि इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, अशी मतदारांची इच्छा आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रात नागरी समस्यासुद्धा आहेत. जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्र रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतात. त्यामुळे बाकी मतदारसंघातील तरुणांच्या अपेक्षा देखील रामटेक शहरातील तरुणांप्रमाणेच आहेत.

हेही वाचा:

  1. अजित पवारांच्या विरोधात पुतण्या राजकीय मैदानात, प्रथमच राजकारणातील प्रवेशावर मांडली स्पष्ट भूमिका
  2. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेपी नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर, नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र
  3. शिरूर लोकसभा मतदार संघात रंगणार तिरंगी लढत; जागा वाटपाच्या शक्यतेवरून संभाव्य उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू

Last Updated : Apr 18, 2024, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.