ETV Bharat / state

मी काँग्रेससोबत आहे, काँग्रेससोबतच राहणार; मला पक्षाकडून फारशा अपेक्षा नाहीत - विजय वडेट्टीवार - अशोक चव्हाण

Vijay Wadettiwar : ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही बैठक बोलावली आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 8:44 AM IST

Updated : Feb 13, 2024, 9:03 AM IST

मुंबई Vijay Wadettiwar : ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार, अशोक चव्हाण आजच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील. त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

काँग्रेसची तातडीची बैठक : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा तसेच बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अशोक चव्हाण यांचं जाणं काँग्रेससाठी मोठा धक्का मानलं जातंय. तसेच त्यांच्याबरोबर पक्षाचे 10-12 आमदारही सोडून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसनं ही तातडीची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता कुलाब्यातील गांधी भवन (तन्ना हाऊस) येथे ही बैठक होईल.

मी काँग्रेससोबतच राहणार : गेल्या काही दिवसांपासून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमात झळकत आहेत. यावर वडेट्टीवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिल. "आज अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होत आहे. पक्षात बदल होत आहेत. मी काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहणार. मी काँग्रेसच्या चिन्हावर चार विधानसभा निवडणुका जिंकल्या. मंत्री आणि दोनदा विरोधी पक्षनेता झालो. आता मला पक्षाकडून फारशा अपेक्षा नाहीत. मी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्धार केला आहे", असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. आधी विखे अन् आता चव्हाणही गेले; 'वंचित'ची वेगळीच व्यथा, पडला 'हा' मोठा प्रश्न
  2. अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं पाऊस पडेल का? मी अजित पवारांसारखं बोलणार नाही; ठाकरेंचा टोला

Last Updated : Feb 13, 2024, 9:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.