ETV Bharat / state

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोटोची राखी मिळवा फुकट, फक्त 'ही' आहे अट! - Eknath Shinde Special Rakhi - EKNATH SHINDE SPECIAL RAKHI

Eknath Shinde Rakhi : ठाणे शहरातील बाजारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोच्या खास राख्या आल्या आहेत. या राख्या मोफत देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी दुकानदारानं एक अट सांगितलेली आहे. ही साधी अट पूर्ण करताच मोफत राखी देण्यात येत आहे.

Eknath Shinde Special Rakhi
संपादित छायाचित्र (ETV Bharat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 3:18 PM IST

मुंबई Eknath Shinde Rakhi : रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या लाडक्या बंधुरायासाठी बहिणींनी राख्यांच्या दुकानात गर्दी करायला सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या हातावर शोभणारी सुंदर राखी घेण्यासाठी लगबग करताना सर्वत्र दिसत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचे वारे वाहत आहेत. त्यामुळेच या उत्सवाचाही आता प्रचार प्रसारासाठी वापर होताना दिसत आहे.

Eknath Shinde Rakhi
राखी (Reporter)

आपले सरकार म्हणा मोफत राखी मिळवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ठाणे या मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा पूर्ण फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच व्हावा, या साठी एका दुकानात ‘आपले सरकार ..शिंदे सरकार’असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राखी फुकट देण्याची अनोखी योजना राबवली जात आहे. ग्राहकांना सुमारे 5 हजार राख्या अशा मोफत देण्यात आलेल्या आहेत. "लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी अशा प्रकारे महिलांना मोफत राखी वाटण्याचा कार्यक्रम सुरु आहे," असं ठाण्यातील वामाक्षी या दुकानाच्या मालक कल्पना गांगर यांनी सांगितलं.

आनंद आश्रमात मुख्यमंत्री करणार रक्षाबंधन : धर्मवीर आनंद दिघे हयात असताना ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असे. आनंद दिघे यांना राखी बांधण्यासाठी अनेक महिला आनंदाश्रमात दूरवरून यायच्या. आनंद दिघे यांना राखी बांधण्यासाठी महिलांच्या रांगा लागायच्या. मात्र आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ही प्रथा बंद पडली. या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंदाश्रमात जाणार आहेत. ते यावर्षी आपल्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधून घेतील, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना राज्यभरात राबवली जात आहे. बहिणींनीदेखील मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ मानत राखी बांधावी. भावाला मताच्या रूपात आशीर्वाद द्यावा, असा या मागचा उद्देश असावा, अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्री ध्वजारोहण करताना उडाला गोंधळ; दोरी गठ्ठ बांधल्यानं उघडला नाही ध्वज अन्.... पाहा व्हिडिओ - CM Eknath Shinde Flag Hoisting
  2. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती आले पैसे ? - Ladki Bahin Scheme Money Credited
  3. मुख्यमंत्री तीर्थ दर्शनचे पोर्टल नसल्यानं ऑनलाईन अर्ज बंद, योजनेकडं ज्येष्ठ नागरिकांची पाठ? - CM Tirth Darshan Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.