मुंबई - मराठी भाषा दिनानिमित्त मराठी चित्रपट सृष्टी येथील कलाकारांनी मराठी नाटकांच्या आणि चित्रपटांच्या रसिकांना मराठी नाटक चित्रपट या कार्यक्रमाची तिकिटे वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी एक ॲप लॉन्च केलं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेता व महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, महेश कोठारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांनी आधी आपल्याच कराकरांचा आदर करायला शिकले पाहिजे असा उपदेश दिला. सोबतच मराठी चित्रपट आणि नाटक सृष्टीत आपण लवकरच एक नवा उपक्रम घेऊन येणार असल्याची घोषणा देखील यावेळी राज ठाकरे यांनी केली.
आपल्याला जर एखाद्या नाटक, चित्रपटाचं तिकीट हवं असेल तर त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या ॲपवर सर्वच भाषेतील नाटक, चित्रपट, कलाकृती उपलब्ध असल्याने मराठी प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या नाटकाचं आणि चित्रपटाचं बुकिंग करण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. यावर उपाय म्हणून आता ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने नवं ॲप सुरू केलं असून, त्याला 'तिकीटालय' असं नाव देण्यात आल आहे. या ॲपचे अनावरण ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित अशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "ज्यांना लहानपणापासून पडद्यावर काम करताना पाहत आलोय, अशा दोन ज्येष्ठ अभिनेत्यांच्यामध्ये बसण्याची संधी दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. संकर्षण कराडे यांनी मगाशी 'चंकू' सर असा उल्लेख केला. मी त्यांना सांगू इच्छितो 'चंकु' सर अस काही नसतं ते चंद्रकांत कुलकर्णी आहेत. मी या आधी देखील नेहमी सांगत आलोय आपल्या लोकांचा आदर आपणच केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 15 कोटी आहे. त्यात इतर राज्यातील नागरिक पकडले तर साधारण ते दीड कोटी आहेत. हे दीड कोटी वगळता उर्वरित सर्व आपले मराठी बांधवच आहे. असं असताना मराठी चित्रपट नाटकांना प्रेक्षक मिळत नाहीत अशी वेळ आहे. हे का होते? त्याचा विचार एक कलाकार आणि निर्माते म्हणून तुम्ही सर्वांनी करायला हवा."
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "युरोप देशापेक्षा जास्त आपल्या मराठी बांधवांची संख्या आहे. मी तुम्हाला एक राजकारणातल उदाहरण देतो. साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी जेव्हा नेते कोकणात जायचे त्यावेळी भाषणात बोलायचे आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू. या एका आश्वासनावर तेव्हा कोकणातील लोक मतदान करायचे. मग कोकणातल्या लोकांनी टीव्हीवर बेवॉच चित्रपट पाहिला. आता कोकणचा कॅलिफोर्निया करू अस एकही राजकीय नेता कोकणात जाऊन बोलत नाही. कारण आता कोकणातल्या लोकांना देखील कळायला लागल आहे. सांगण्याचा उद्देश इतकाच की, जे चित्रपट, नाटक मला टीव्हीवर, मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहेत ते पाहण्यासाठी मी जास्त पैसे देऊन चित्रपटगृहात का जाऊ? हा साधा विषय आहे. आणि त्याचा विचार तुम्ही सर्वांनी करायला हवा. आता मराठी चित्रपट नाटक सृष्टीने देखील कात टाकली पाहिजे."
हेही वाचा -