ETV Bharat / state

मराठा मोर्चा म्हणजे कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे- राज ठाकरे - Manoj Jarange Patil

Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिसुचनेनंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, मग मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषण करायची वेळ का आली? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 6:05 PM IST

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

नाशिक Raj Thackeray on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा मोर्चा काढला. त्यासाठी ते मुंबईपर्यंत आले. मुख्यमंत्र्यांनी अधिसुचना काढल्यानंतर मराठा आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये भाष्य केलंय. मराठे तापले की, मुंबईत येतात. पण यामागं काही राजकीय अजेंडा आहे का? मराठा आरक्षणावर बोलताना मराठा बांधवांनी हे एकदा तपासून पाहावे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली? : विजयोत्सवानंतर मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली? “मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. पण कोणता विजय झाला? हे जनतेला कळायला हवं. मुंबईत आलेल्या सर्वसामान्य मराठा बंधू-भगिनींना काय निर्णय झाला, हे कळलं का? तुम्ही आनंद व्यक्त करता, तर पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

माझी भूमिका स्पष्टपणे मांडली : तसंच जेव्हा 'मी' मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तेव्हा मी आंदोलकांसमोर माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणार नाही. ही तांत्रिक आणि कायदेशीर समस्या आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. केंद्र सरकारला याबाबत निर्णय घ्यायचा, असेल तर त्यासाठी सर्व राज्यांचं मत लक्षात घ्यावं लागेल. कारण प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागणार आहे. विशेष अधिवेशन बोलावावं लागेल,” असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लवकरच अयोध्येला जाणार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस नाशिकमध्ये आले असता त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशी सर्वांना अपेक्षा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते तयारीला लागले आहेत. अयोध्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सगळे शांत झाल्यावर 'मी' देखील लवकरच अयोध्येला जाणार आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • मनसेतील गटबाजी : सत्तेत असलेल्या पक्षांची गटबाजी दिसत नाही. मात्र विरोधी पक्षात गटबाजी दिसत आहे. उद्या लोकसभेत तडे गेलेले दिसतील. आमचा कारभार उघडा आहे. मी काल पदाधिकाऱ्यांना पहिला डोस दिलाय. ज्यांना समाजात ओळख नाही, अशांच्या भरवशावर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असंदेखील ठाकरे म्हणाले.
  • माझा टोलला विरोध नाही : माझा टोलला विरोध नाही. टोलवसुली करताना नियमबाह्य पैसे घेतले जातात. त्याला माझा विरोध आहे. मुद्दा टोलचा नसून टोलवसुलीचा आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आतापर्यंत किती टोसवसुली झाली, याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचं सादरीकरण करणार आहे.
  • महागाई इंधन वाढीवर बोला : महागाई, इंधनाबाबत, कुणी बोलायला तयार नाही. मराठी माणसाला घर नाकारण्याबद्दल कोणी बोलत नाही. राजकीय अवस्था जशी खालावली, तशीच पत्रकारितेची अवस्था झालीय, असा टोलादेखील त्यांनी माध्यमांना लगावला आहे.

हे वाचलंत का :

  1. "पुणे लोकसभेसाठी पक्षाकडून माझाच क्लेम", मनसे नेते वसंत मोरे यांचा दावा
  2. मराठा आरक्षणावरून महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये जुंपली?
  3. मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर उपस्थित केला प्रश्न; नेमकं काय म्हणाले? वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.