ETV Bharat / state

विशाळगड परिसरातील हिंसाचार रोखण्यात पाऊस ठरला अडचणीचा, कोल्हापूर पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा - Vishalgad Encroachment - VISHALGAD ENCROACHMENT

Vishalgad Encroachment : विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या आणि तोडफोडीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सोमवारी सुनावणी झाली. तर मुसळधार पावसामुळं विशाळगड परिसरातील हिंसाचार रोखण्यास अडथळा निर्माण झाल्याचा दावा, कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) केलाय.

Vishalgad Encroachment
गजापूर परिसरात हिंसाचार आणि उच्च न्यायालय (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 9:59 PM IST

मुंबई Vishalgad Encroachment : विशाळगड किल्ला (Vishalgad) जवळील गजापूर परिसरात 14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यामध्ये त्यावेळी पडत असलेला मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळं अडथळा निर्माण झाल्याचा दावा, कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) केला. विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या आणि तोडफोडीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी पोलिसातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली. यामुळं वेळेत कारवाई करणं शक्य झालं नसल्याचं पोलिसातर्फे सांगण्यात आलं. एवढ्या नाजूक परिस्थितीतही पोलिसानी त्यांचे कर्तव्य चांगल्याप्रकारे बजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा स्वतः पोलिसांनीच प्रतिज्ञापत्रातून केलाय.

उच्च न्यायालयात याचिका दाखल : राज्यातर्फे ॲड. जनरल डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. तर ज्येष्ठ वकील ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. अयुब कागडी आणि इतरांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करुन रहिवासी यांचे बांधकाम तोडण्यात आले का? याबाबत माहिती सादर करावी असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. तर विशाळगड येथील कोणतेही रहिवासी यांचे बांधकाम तोडण्यात आले नाही, अशी माहिती डॉ. सराफ यांनी राज्यातर्फे दिली. तर, केवळ व्यावसायिक बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती पुरातत्व खात्याचे उपसंचालक हेमंत दळवी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.

24 जणांना अटक : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी.कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाहुवाडी पोलिसांतर्फे हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी जमाव करण्यास मनाई असल्याचं सांगितल्यानंतरही गजापूर येथे जमाव करुन जाणाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या माजी खासदार संभाजीराजे, रविंद्र पडवळ, बंडा साळुंखे यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली असून पडवळ फरारी आहेत. पडवळला आणि इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निर्णय घेण्यात पोलिस गडबडले : विशाळगडा जवळ असलेल्या पावनखिंड येथे त्याचदिवशी शौर्य दिवस साजरा करण्यात येत होता. त्यामुळं तिथे शेकडो जण जमले होते. त्यामुळं पावनखिंडला जाणारे कोण आणि विशाळगडला जाणारे कोण याचा निर्णय घेण्यात पोलिस गडबडले. दगडफेकीत 18 पोलिस देखील जखमी झाल्याकडं लक्ष वेधण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती, सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश - Vishalgad Encroachment
  2. Vishalgad Fort : संततधार पावसामुळे विशाळगडाचा बुरुज ढासळला
  3. Kolhapur Landslide Live Update: करंजफेणमध्ये पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली, विशाळगडावरील जमीन खचली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.