शिर्डी : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) शिर्डीत येऊन साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं (Ashwini Vaishnav in Shirdi) दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वैष्णव यांनी सांगितलं की, "शिर्डी-मुंबई फास्ट कनेक्टिव्हिटीसाठी शिर्डी ते नाशिक असा दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्याच्या आराखड्यावर काम सुरू असून लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार. यासोबतच प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्गही पूर्ण केला जाईल." तसंच शिर्डी ते मुंबईसाठी दुसऱया 'वंदे भारत ट्रेन'ची (Shirdi Mumbai Vande Bharat) माहिती वैष्णव यांनी दिली.
'वंदे भारत ट्रेन' सुरू करण्याची ग्रामस्थांची विनंती : दरम्यान, शिर्डीहून मुंबईकडं धावणाऱ्या' 'वंदे भारत ट्रेन'च्या वेळेत बदल करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, चैतन कोते, सुजित गोंदकर यांनी केली. भाविकांना शिर्डीला ये-जा करताना अनेक अडचणी येत आहेत. तसंच शिर्डी ते मुंबई अजून एक नवीन 'वंदे भारत ट्रेन' सुरू करण्याची विनंती ग्रामस्थांनी अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाला उत्तर देत सर्व मागण्या लवकरच मान्य केल्या जातील, असं आश्वासन दिलं.
अश्विनी वैष्णव यांचा सत्कार : साई समाधीच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबांची मूर्ती व शाल देवून मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार केला. दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी साईबाबांच्या द्वारकामाई व गुरुस्थानचेही दर्शन यावेळी घेतलं. यावेळी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
अश्विनी वैष्णव यांची माहिती : शिर्डी-मुंबई फास्ट कनेक्टिव्हिटीसाठी शिर्डी ते नाशिक असा दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे. लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. तसंच पुणे-नाशिक रेल्वे मार्गही पूर्ण केला जाईल. शिर्डी-मुंबई दुसरी 'वंदे भारत ट्रेन'ही लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
हेही वाचा