नवी मुंबई Nilakanth Gharat Passed Away : रायगड जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचं शुक्रवारी (2 फेब्रुवारी) दुपारी निधन झालं. अटल सेतूवर उडवण्यासाठी आणलेल्या फुग्याचा स्फोट होऊन घरत हे 70 टक्के भाजले होते. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन झालं. या उद्घाटनानंतर रायगड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण होतं. हा आनंदोस्तव साजरा करण्यासाठी भाजपाचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांनी अटल सेतूवर उडवण्यासाठी मोठा फुगा आणला होता. हा फुगा 11 जानेवारीलाचं आणून ठेवला होता. तो फुगा त्यांनी त्यांच्या नवी मुंबईजवळील चिर्ले या गावातील घराच्या टेरेसवर ठेवला होता. दरम्यान, फुग्यातली हवा कमी झाल्याने ते फुग्यात हवा भरायला गेले असता, त्या फुग्याचा स्फोट झाला. त्यामध्ये नीलकंठ घरत सुमारे 70 टक्के भाजले. यावेळी मुलगा काही कामानिमित्तानं खाली गेल्याने थोडक्यात वाचलाय.
23 दिवस उपचार सुरू होते : अटल सेतूवर उडवण्यासाठी मोठा फुगा मुलाच्या मदतीनं निळकंठ घरत यांनी टेरेसवर आणून ठेवला होता. मात्र, काही काम होतं, म्हणून त्यांचा मूलगा खाली गेला होता. त्याच, दरम्यान निळकंठ घरत हे फुग्यात हवा भरत होते. हवा भरत असताना फुग्याचा स्फोट झाला. त्यामध्येच निळकंठ घरत हे भाजले गेले. त्यानंतर त्यांना तत्काळ नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तब्बल 23 दिवस उपचार सुरू होते. परंतु, अखेर त्यांचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर चिर्ले येथील गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :
2 मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल