ठाणे Rahul Gandhi News : ठाण्यात शनिवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. भिवंडीवरुन ठाण्यात आल्यानंतर ठाण्यात मुंब्रा, कळवामार्गे ही यात्रा चिंतामणी चौक इथं सभा झाल्यानंतर मुलुंडमार्गे पुढं जाणार आहे. त्यामुळं या सर्व मार्गावर कशा प्रकारे नियोजन करायचं यासाठी बैठका सुरू आहेत. यासाठी ठाण्यातील सर्व जेष्ठ नेते तयारीला लागले आहेत.
पक्षाचे नेते कामाला : ठाण्यात येणाऱ्या भारत जोडो न्याययात्रेसाठी जसे काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. तसंच महाविकास आघाडी देखील कामाला लागलीय. या यात्रे दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातून ही भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे. त्यामुळं काही काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केलीय. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा 2000 सालानंतर शिवसेनेकडे गेलाय. तीन वेळा महापौर पद मिळवणारा काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यानंतर ठाण्यावरील काँग्रेसची पकड ढिली झाली. राहुल गांधी यांच्या यात्रेनंतर आता ठाण्यातील काँग्रेसचे दिवस चांगले येतील, अशा विश्वास असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय.
काँग्रेसचे दोन गट आले समोर : सुरुवातीपासूनच ठाण्यातील काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण असल्याचं समोर आलंय. या राजकारणामुळं पक्षाचं मोठं नुकसान होऊन सत्ता गेल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक कमी झाले. याचा परिणाम म्हणून ठाणे महापालिकेत काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक आहे. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले विक्रांत चव्हाण हे या यात्रेसाठी वेगळी तयारी करत आहेत. काँग्रेसचे इतर नेते दुसरीकडे वेगळी तयारी करताना दिसत आहे. यावरुन ही काँग्रेसमधील गटातटाकडून भारत जोडो यात्रेची तयारी असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला फोडण्यासाठी प्रयत्न : ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठाण्यात आता राहुल गांधी यांची येणारी भारत जोडो न्याय यात्रा ही महायुतीला आव्हानात्मक ठरावी. यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत.
हेही वाचा :