ETV Bharat / state

महिला शिपायानं हवालदार पतीला खोट्या 'पोक्सो'त अडकवलं; मुंबई उच्च न्यायालयानं दिला जामीन

Wife Files False Pocso case : पुण्यातील पोलीस शिपाई पत्नीनं हवालदार असलेल्या पतीवर, मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 'पोक्सो'ची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन हवालदार पतीवर गुन्हा दाखल झाल्यानं तो कारागृहात होता. मात्र हा गुन्हा खोटा असल्याचं जाहीर करत मुंबई उच्च न्यायालयानं हवालदार पतीला जामीन मंजूर केला आहे.

Wife Files False Pocso case
मुंबई उच्च न्यायालय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 2:42 PM IST

मुंबई Wife Files False Pocso case : पुणे जिल्ह्यातील महिला शिपाई असलेल्या पत्नीनं पोलीस हवालदार असलेल्या पतीवरच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी हवालदार पतीवर 'पोक्सो' कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात हवालदार पती अटकेत होता. त्यानं मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत अर्ज केला. हा संपूर्ण गुन्हाच खोटा असल्याचा त्याचा दावा होता. "हे संपूर्ण प्रकरण आणि हा 'पोक्सो' कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा बनावट आहे. त्यामुळंच आरोपी पोलीस हवालदारास जामीन देण्यात येत आहे, असा निर्णय दिला," असं न्यायमूर्ती माधव जे. जमादार यांनी निर्णयात म्हटलं आहे.

पोलीस शिपाई पत्नीनं हवालदार पतीवर दाखल केली तक्रार : पुणे जिल्ह्यातील महिला पोलीस शिपाई असलेल्या पत्नीनं आपल्या पोलीस नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन हवालदार पतीविरोधात भारतीय दंड विधान कलम 354 कलम 323 आणि कलम 506 तसंच 'पोक्सो' कायद्यांतर्गत स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हवालदार पतीला अटक करण्यात आली होती. मात्र तक्रारदार महिला शिपाई आणि तिचा वकील रोहित कुमार यांनी खोटं प्रतिज्ञापत्र आणि खोटी तक्रार दाखल केल्याची बाब नवऱ्याच्या वतीनं वकील वैभव कुलकर्णी यांनी लक्षात आणून दिली. त्यामुळं न्यायमूर्ती माधव जे जमादार यांनी आरोपी पतीस जामीन मंजूर केला.

तक्रारदार महिला शिपायानं आई ऐवजी केली स्वाक्षरी : अटकेत असलेल्या पतीच्या वतीनं वकील वैभव कुलकर्णी यांनी बाजू मांडली की, "या संपूर्ण प्रकरणात पतीवर खोटा गुन्हा नोंदवला गेलेला आहे. एफआयआरमध्ये 5 जून 2020 रोजी घटना घडल्याचं म्हटलं आहे. त्या घटनेचा गुन्हा 9 नोव्हेंबर 2022 इतक्या उशिरानं नोंदवला गेलेला आहे. तो देखील पोक्सो कायद्याअंतर्गतचा गुन्हा आहे. तसंच पत्नीनं या खटल्यात जो वकील नेमला होता, त्या वकील रोहित कुमारनं खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं. प्रतिज्ञा पत्रावर तक्रारदार महिला कॉन्स्टेबलच्या आईची सही पाहिजे, त्याऐवजी स्वतः तक्रारदार महिलेचीच सही आहे."

तक्रारदार महिलेची भामटेगिरी न्यायालयासमोर झाली उघड : हवालदार पतीच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या नजरेस आणून दिल्यावर न्यायमूर्ती माधव जमादार यांनी तक्रारदार महिलेला याबाबत प्रश्न विचारला." या प्रतिज्ञापत्रावर तुमच्या आईची सही आहे की तुमची? त्यावेळेला स्वतः तक्रारदार महिलेनं तिथं कबुली दिली. "तिनंच आईच्या ऐवजी स्वतःची स्वाक्षरी केलेली आहे." न्यायालयाला ही बाब अत्यंत धक्कादायक वाटली. त्यामुळंच त्यांनी हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचं म्हणत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा देखील खोटा असल्याचं स्पष्ट केलं. आरोपी पोलीस हवालदार पतीला जामीन मंजूर केला. तसंच पुढील सुनावणी येत्या आठवड्यात न्यायालयानं निश्चित केलेली आहे.

कायद्याचा दुरुपयोग सहन करणार नाही : न्यायालयानं आपला निर्णय देताना महत्त्वाची टिप्पणी केली आहे. "महाराष्ट्राच्या पोलीस सेवेमध्ये एका कॉन्स्टेबल पदावर असणाऱ्या व्यक्तीनं आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. पोलीस प्राधिकरणात असलेल्या व्यक्तीनं अशा गंभीर कायद्यांचा दुरुपयोग करत खोटा गुन्हा नोंदवणं हे धक्कादायकच आहे. कायद्याचा दुरुपयोग कोणत्याही व्यक्तीकडनं न्यायालय सहन करणार नाही."

हेही वाचा :

  1. Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा
  2. कोरोनाच्या काळात लैंगिक शोषण, २ वर्षानंतर जबाब घेऊन तिघावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.