पुणे- शिवाजीनगर ते स्वारगेट या अंडरग्राउंड मेट्रोच्या उद्घाटनावरून राजकारणात सुरू झालं आहे. ही मेट्रोने सेवा सुरू करावी. अन्यथा आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचं उद्घाटन करू, असा इशारा देत महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. मुसळधार पाऊस झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गुरुवारी होणारा पुण्याचा दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण 22,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार होते.
पंतप्रधान कॉरिडॉरचे उद्घाटन करण्याबरोबरच पंतप्रधान मोदी रविवारी स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाची पायाभरणी करतील, अशी माहिती नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर शेअर केली. मात्र, आजही विकासकामाचे उद्घाटन होत नसल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पुणे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.
मेट्रोच्या उद्घाटनासाठी विरोधक आक्रमक- पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द पुढे ढकलल्यानंतर शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान मोदींनी ऑनलाइन उद्घाटन करण्याचा गुरुवारी सल्ला दिला होता. याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्घाटन केल्याचही त्यांनी म्हटलं होतं. पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करून मेट्रो सेवेच्या उद्घाटनाबाबत भूमिका स्पष्ट केली होती.
अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठरलेला असतानाच आम्ही आमची भूमिका मांडली होती. मेट्रो सुरू करायला खूपच विलंब झाला आहे. मेट्रो 3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होती. ती सुरू करायला आठ वर्ष लागली आहे. पावसामुळे पंतप्रधान आज पुण्यात येत नसेल तर त्यांनी ऑनलाईन माध्यमातून याच उद्घाटन करावं-पुणे काँग्रेस शहराचे अध्यक्ष-प्रशांत जगताप
Hon. PM Shri. Narendra Modi ji will be inaugurating the Shivajinagar District Court - Swargate stretch of Pune Metro and laying the foundation stone of Swargate - Katraj stretch virtually, on 29th September.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 26, 2024
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते (व्हर्चुअली)…
जनतेच्या पैशातून निर्माण झाली मेट्रो मार्गिका- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही. पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणं योग्य नाही. म्हणूनच उद्यापर्यंत ही मार्गिका सुरू न केल्यास महाविकास आघाडीच्या वतीनं मार्गिकेचे उद्घाटन केले जाईल," असे त्यांनी सांगितलं.
हेही वाचा-