ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शो कार नोंदणी न करताच रस्त्यावर, 40 लाखांचा टॅक्स नुसता भरणं आहे बाकी - Pune Hit and Run Case - PUNE HIT AND RUN CASE

Pune Hit and Run Case Update : पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या कारनं अपघात झाला ती पोर्शो कार नोंदणी न करताच वापरण्यात जात असल्याची माहिती समोर आलीय. तसंच या कारचा 40 लाखांचा टॅक्सही भरला नसल्याचं समोर आलंय.

Pune Hit and Run Case Update
पुणे हिट अँड रन प्रकरण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 1:39 PM IST

पुणे Pune Hit and Run Case Update : पुणे शहरातील कल्याणी नगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आज (21) पुणे पोलिसांकडून अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणाची आता देशभर चर्चा होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आलिशान पोर्शो कारनं दोघांचा जीव गेला. त्या कारची आरटीओ कार्यालयात नोंदणीच झालेली नसून नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर चालवली जात होती. तसंच धक्कादायक बाब म्हणजे या आलिशान कारचा 40 लाखांचा टॅक्स न भरल्यानं तिची नोंदणी झालेली नाही, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

पुण्यातील कल्याणी नगर येथे जो अपघात झाला आणि ज्या अल्पवयीन मुलानं दोन जणांना उडवत त्यांचं जीवन संपवलं, त्या आलिशान कारला दोन्ही बाजूस नंबर प्लेट नव्हती. तसंच आता त्याबाबत माहिती घेतली असता त्या कारचा टॅक्स न भरल्यानं नोंदणीच झालेली नसल्याचं समोर आलय. विशेष म्हणजे, ही कार मुंबईतील शोरूममधून पुण्यात आणली गेली. गेल्या दोन महिन्यांपासून ही कार पुण्यातील रस्त्यांवर विना नंबरप्लेट धावत असल्याचं सांगितलं जातय. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या देखील ती नजरेस पडली नाही.

आरटीओच्या नियमानुसार नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ते वाहन आरटीओ (परिवहन कार्यालय) नोंद करून संबंधित व्यक्तींच्या नावावर केली जाते. जी नवीन गाडी संबंधित मालकाकडून घेतली जाते, त्या वाहनाला एक क्रमांक दिला जातो आणि मगच ते वाहन संबंधित वाहन खरेदीदाराला दिलं जातं. याची संपूर्ण जबाबदारी ही ज्या ठिकाणावरून वाहन खरेदी केलं त्या शोरुम चालकाची असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तो पर्यंत वाहन हे खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सोपवलं जात नाही. तसंच ते वाहन रस्त्यांवर चालविण्यास देखील नियमानुसार बंदी असते.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरील अलिशान कार परराज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली आणि मुंबईतील एका शोरूममधून या बिल्डरनं ती कार घेतली. त्यानंतर ती नावावर करण्यासाठी 20 मार्च 2024 म्हणजे, बरोबर दोन महिन्यांपूर्वी आरटीओ कार्यालयात अर्ज दाखल केला होता. आरटीओ कार्यालयाने त्याची पाहणी (इन्स्पेक्शन) केली. त्यानुसार या कारच्या किंमतीनुसार साधारण 40 लाख रुपयांचा कर (टॅक्स) भरणा करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, तो कर भरण्यात आला नाही. त्यामुळं त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तसंच, संबंधित गाडीबाबत नंतर ते आरटीओ कार्यालयाकडं आलेही नाही.

हेही वाचा -

  1. कल्याणीनगर अपघातात प्रकरणात आरोपीला अटक, सोसायट्यांमधून बार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप - Pune accident news
  2. पुणे हिट अँड रन अपघात : 'त्या' अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं 'या' अटींवर दिला जामीन - Pune Accident News
  3. भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.