ETV Bharat / state

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारनं उडवलं, एकाचा मृत्यू - Pune Hit and Run Case - PUNE HIT AND RUN CASE

Pune Hit and Run Case : पुणे शहर पुन्हा एकदा हिट अँड रन अपघातानं हादरलंय. अज्ञात भरधाव वाहनानं रात्री गस्त घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला.

Once again hit and run in Pune, one police constable died and one seriously injured
पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 10:01 AM IST

Updated : Jul 8, 2024, 11:04 AM IST

पुणे Pune Hit and Run Case : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण समोर आलंय. एका अज्ञात वाहनानं दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. तर अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झालाय. दरम्यान, आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त (Source reporter)

काय घडलं? : हा अपघात रविवारी मध्यरात्री हॅरिस ब्रीज बोपोडी जवळ रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास झाला. यासंदर्भात अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे पोलीस हवालदार समाधान कोळी आणि पोलीस कर्मचारी संजोग शिंदे रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. तेव्हा समोरून वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिली. या अपघातात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजोग शिंदे यांच्यावर सध्या रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमितेश कुमार रुग्णालयात : अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. मात्र, गाडीचा वाहन नंबर पोलिसांना मिळाल्याचं अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितलं. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉल रुग्णालयाला भेट दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, कल्यानीनगर येथील हायप्रोफाईल अपघातानंतर देशातील हिट अँड रनची देशभरात चर्चा झाली. अशातच पुन्हा हिट अँड रनची घटना घडल्यानं नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

हेही वाचा -

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शाह अजूनही फरारच, पोलिसांकडून लूक आऊट सर्क्युलर - Worli Hit and Run Case
  2. पुणे हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटूंबियांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; आर्थिक मदतीची केली घोषणा - Pune Porsche Car Hit And Run Case
  3. 'वरळी हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची आदित्य ठाकरेंची मागणी; मुख्यमंत्री म्हणाले, "शिवसेनेचा कार्यकर्ता असला..." - Worli Hit And Run Accident

Last Updated : Jul 8, 2024, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.