ETV Bharat / state

पुणे हादरले! ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार; तीन संशयितांना अटक - Firing On Businessman - FIRING ON BUSINESSMAN

Firing On Businessman : पुण्यात गणपती विसर्जनाच्या (Pune Ganpati Visarjan) पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली आहे. कोंढवा येथील वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात वाळू व्यावसायिक जखमी झाला आहे. या प्रकरणी तीन संशयितांना अटक केल्याची माहिती, पोलिसांनी दिली.

Pune Ganpati visarjan
पुण्यात गोळीबार (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 5:34 PM IST

Updated : Sep 16, 2024, 6:13 PM IST

पुणे Firing On Businessman : गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात देखील पुण्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. पुणे शहरात मागील काही दिवसात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार (Firing) झाल्याची घटना कोंढवा येथील गांगाधाम परिसरात घडली आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त आर राजा (ETV BHARAT Reporter)

आज दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात गायकवाड नावाची व्यक्ती जखमी झाली आहे. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. - आर राजा, पोलीस उपायुक्त

पूर्व वैमनस्यातून व्यावसायिकाला घेरलं : कोंढवा येथील गंगाधम चौकात 2 ते 3 अज्ञात तरुणांनी भर दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास वाळू व्याव्यसायिकावर गोळीबार केला. या गोळीबारात वाळू व्यावसायिक जखमी झाला आहे. या हल्ल्यात 2 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. या वाळू व्यावसायिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या चॅटिंगवरून गोळीबार : या आधीही पुणे शहरातील सिंहगड पोलीस चौकीच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत एका बांधकाम व्यावसायिकाने दुसऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला होता. विशेष म्हणजे, गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सिंहगड पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर होते. या गोळीबारात रमेश राठोड (रा. वारजे, पुणे) हे जखमी झाला होता. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. संतोष पवार, देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज ऑटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते

हेही वाचा -

  1. जॉर्जियातील शाळेत विद्यार्थ्याच्या हातात पेनऐवजी बंदूक, अंदाधुंद गोळीबारात चार जण ठार - US GUN VIOLENCE
  2. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेची चोरली साखळी, विरोध करणाऱ्या माणसावर चोरट्याकडून गोळीबार - cctv video of chain snatcher
  3. गायक एपी ढिल्लननं घराबाहेर गोळीबार प्रकरणी दिली प्रतिक्रिया, लॉरेन्स बिश्नोई-रोहित गोदाराच्या टोळीनं घेतली जबाबदारी - AP DHILLON ON FIRING CASE

Last Updated : Sep 16, 2024, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.